नवी दिल्ली : शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयात सापडलेल्या दारुच्या बाटल्यांच्या मुद्द्यावरून भाजपला फैलावर घेतलं आहे. त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात. भाजपने या बाटल्या लॅबमध्ये नेऊन तपासाव्यात. त्या किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले.
प्रताप सरनाईकांनाच्या कामाशी बरोबरी करून दाखवा, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान
महाराष्ट्राच्या मंत्रालयाला तुम्ही कशाला बदनाम करताय? मंत्रालयात काही तरी बाटल्या सापडल्याचं भाजपचं म्हणणं आहे. त्याचा आम्हाला दिल्लीतून वास येत नाही तेवढा. आम्हाला कोणता वास काय कळत नाही. आता कोण वास घ्यायला गेलंय बाटल्यांचा हे पाहावं लागेल. पण मला कोण्या तरी अधिकाऱ्याने सांगितलं की या साधारण दीड वर्षांपूर्वीच्या बाटल्यांचा हा खच आहे. या बाटल्या आताच्या नाही दीड वर्षापूर्वीच्या आहेत. कदाचित आमचं सरकार नसावं त्यावेळेला. या मधल्या संपूर्ण काळामध्ये मंत्रालयात कुणाचा वावर नव्हता. वर्षभर तर मंत्रालय बंदच होतं. आता हळूहळू सुरू झालं आहे. माणसं जात आहेत. आता या कोणत्या काळातील बाटल्या पडल्यात हे तपासण्यासाठी भाजपने त्या लॅबमध्ये पाठवाव्यात. किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, असं राऊत म्हणाले.
पंतप्रधान आणि अमित शहांची भेट का झाली नाही? चंद्रकांत पाटील यांनी दिले सारवासारवीचे उत्तर
मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्याच्या प्रकरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडल्या. त्यावर त्यांनी संताप व्यक्त केला. दारुच्या बाटल्या सापडणं गंभीर आहे. या घटनेची राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. कोविडच्या बंधनातून दारुच्या बाटल्या मंत्रालयात कशा गेल्या हा विषय नाही. हा कल्चरचा विषय आहे. मंदिरं बंद ठेवून दारूची दुकाने सुरू केली तिथेच कल्चरची वाट लावली. मंदिरांपेक्षा दारूंना महत्त्व प्राप्त झालं. ऑलरेडी गटारीच झाली आहे, असा हल्ला चंद्रकांत पाटील यांनी चढवला होता.
Read Also :
- प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी, चंद्रकांत पाटील यांची माहिती
- मोठी बातमी : अकरावीची सीईटी परिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द; राज्य सरकारला धक्का
- महादेव जानकरांचा अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंना मोलाचा सल्ला, म्हणाले “आता त्यांनी ठरवायचं दुसऱ्यांच्या घरात…”
- “मग हा टाइमपास कशाला?”; सुप्रिया सुळेंवर निलेश राणे यांचा जोरदार घणाघात
- मंत्रालयात आढळलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत उच्च स्तरीय चौकशी करून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करा!