पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बारामती मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण सध्या बारामतीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या असून त्यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे सध्या बारामतीचं राजकारण राज्याच्या राजकीय वर्तुळात बघायला मिळत आहे.
“महाराष्ट्रावर संकट..! अन् शिंदे सरकार दिल्ली वारी एन्जॉय करताहेत”
बारामती मतदारसंघाच्या विकासाचा बोलबोला आहे. मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी काही भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. येथे एकाच कुटुंबावर छप्परफाड सोने पडते आहे. माझ्याकडे बारामतीसह तेलंगणातील अन्य एका मतदारसंघाची जबाबदारी आहे. परंतु पक्ष जेव्हा जेव्हा सांगेल मी बारामतीला येणार आहे. येथील प्रत्येकाशी वैयक्तिक नाते निर्माण करणार आणि भाजपची ताकद वाढवणार असल्याचे त्या म्हणाल्या.
“अमित शहा, फडणवीसांना पुढेपण भेटणार”; भाजप प्रवेशाबाबत खडसेंचं स्पष्टीकरण
यातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही बारामतीचं घड्याळ बंद पाडणार असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता ठरवणार आहे की, कुणाला निवडणुक द्यायचं. परंतु आम्ही बारामतीचं घड्याळ बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
“मला वाटलं तर आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील”; नितेश राणे
भाजप हा घराणेशाहीच्या विरोधात असलेला पक्ष आहे. यात सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक आहेत. देशात काॅंग्रेसने घराणेशाहीचे राजकारण केले. त्यामुळे जनतेने त्यांना दुर केले. आमचा लढा घराणेशाहीविरोधात आहे. अमेठी, रायबरेलीत गेल्या 50 वर्षात जो विकास झाला नाही तो विकास आता भाजपच्या कार्यकाळात पूर्ण केला जात आहे. देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणे हाच आमचा मुख्य हेतु आहे असंही त्या म्हणाल्या.
Read also
- राष्ट्रवादी, अन् आता भाजपच्या नेत्याचीही ठाकरेंना साथ; भाजप नगरसेविकेचा सेनेत प्रवेश
- “पाकिस्तानचे झिंदाबादचे नारे कुणी लावले तर ते सुखरूपपणे घरी जाणार नाहीत”; नितेश राणे
- “महाराष्ट्रात कुणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या तर त्यांना सोडणार नाही”; देवेंद्र फडणवीस
- PFI च्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा
- “गद्दारांना क्षमा नाही, तात्काळ माफी माग, नाहीतर..;” रूपाली पाटलांचा म्हात्रेंना सज्जड दम