मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केला, अन् त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसला. अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंना पाठिंबा जाहीर केला. मात्र असं असलं तरी उद्धव ठाकरे यांना अनेक संघटना पाठिंबा देत आहेत.
“अमित शहा, फडणवीसांना पुढेपण भेटणार”; भाजप प्रवेशाबाबत खडसेंचं स्पष्टीकरण
यातच आता नाशिक येथील भाजप नगरसेवका पूनम धनगर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. दोन दिवसापुर्वी युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून आपल्या पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण केले आहे. गायकवाड यांनी यापुर्वी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव व प्रवक्ते म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर त्यांनी युनायटेड रिपब्लिकन पार्टीची स्थापना करून नगर जिल्ह्यात संघटन केले होते. यातच आता राष्ट्रवादीचा माजी जिल्हाध्यक्षांनी देखील उद्धव ठाकरेंची वाट धरली आहे.
“मला वाटलं तर आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील”; नितेश राणे
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित औरंगाबादमधील राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विजयराव साळवे, वाल्मिकी समाज जिल्हाध्यक्ष विक्की चावरीया, संघर्ष सोनवणे व इतर असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. विजयराव साळवे हे पुर्वी भाजपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा झेंडा हाती पकडला. तसेच त्यांचे अजित पवारांशी जवळचे संबंध होते असं असताना त्यांची अलिकडेच शहराध्यक्ष पदावरूनन उचलबांगडी केली होती. त्याच नाराजीतून त्यांनी सेनेते प्रवेश केल्याचं समजत आहे.
“शीतल ताई डोळ्याच्या दवाखान्यात जाऊन गुडघा तपासून घ्या”; सुळेंच्या त्या फोटोवरून राष्ट्रवादी आक्रमक
दरम्यान, यावेळी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार उदयसिंग राजपुत इत्यादी उपस्थित होते.
Read also
- “पाकिस्तानचे झिंदाबादचे नारे कुणी लावले तर ते सुखरूपपणे घरी जाणार नाहीत”; नितेश राणे
- “महाराष्ट्रात कुणी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या तर त्यांना सोडणार नाही”; देवेंद्र फडणवीस
- PFI च्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा
- “गद्दारांना क्षमा नाही, तात्काळ माफी माग, नाहीतर..;” रूपाली पाटलांचा म्हात्रेंना सज्जड दम
- “महाराष्ट्रावर संकट..! अन् शिंदे सरकार दिल्ली वारी एन्जॉय करताहेत”