मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने शिंदे गटावर प्रखर शब्दात टिका केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदेंवर जोरदार टिकास्त्र सोडलं जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गट देखील जोरदार हल्लाबोल करीत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
“बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हॅक झाल्याने मला अतिव दु:ख”; सुधीर मुनगंटीवार
नाव, नेता आणि चिन्ह पाहणाऱ्या कॉपी बहाद्दर लोकांनो, तुमचे सुपर सीएम देवेंद्र फडणवीस आणि मातृसंस्था भाजप ला पटकन विचारून चिन्ह आज तरी अंतिम करा…. स्वत:चे असेही तुमच्याकडे काहीच नाही. असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सुरूवातीला त्रिशूळ, उगवता सुर्य आणि मशाल अशी चिन्हे सादर केली होती. परंतु शिंदे गटाने देखील तीच चिन्हे सादर केल्याने ती रद्द करण्यात आली.
“उद्धवजी तुम्ही लढा..आम्ही आहोत तुमच्यासोबत”; काॅंग्रेसचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा
निवडणुक आयोगाने काल उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह देण्यात आलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राजकीय पक्षाचं नाव दिलं आहे. यातच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. आज शिंदे गटाने तळपता सुर्य, ढाल तलवार, आणि पिंपळाचे झाड हे तीन चिन्ह सादर केले आहेत. यावर आता निवडणुक आयोग निर्णय घेऊन शिंदे गटाला निवडणुकीसाठी राजकीय चिन्ह मिळणार आहे.
Read also
- “धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला, त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार”
- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तत्काळ घ्या…! जिल्हा परिषद सदस्य असोसिएशनची मागणी
- “शिव्या हासाडणारे सत्तारांनी सुचवलेलं कुत्रा निशाणी घ्या”; रूपाली पाटलांचा शिंदेंना टोला
- “उद्धव ठाकरे ज्यावेळी सोनिया गांधी समोर झुकले, त्याचवेळी भाजपचा कार्यकर्ता म्हणून दु:ख झालं”
- “हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळे प्रभु श्रीरामाने ‘धनुष्यबाण’ हिसकावलं”