पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशीच कोथरूड भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल आठ तासातच मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याच्यासह आठ जणांना ताब्यात घेतले. सुरूवातीला मोहोळच्या हत्यामागे मुन्ना पोळेकर याचा मामा नामदेव कानगुडे असल्याचा संशय होता. परंतु पोलिसांनी अधिक तपास केला असता यात रामदास मारणे याचं नाव समोर आलं. परंतु पोलिसांनी अधिक तपास केला असता हे तिघे नसून चौथा व्यक्ती शरद मोहोळच्या हत्येचा मास्टर माईंड असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मुळशी तालुक्यातील गुंड विठ्ठल शेलार हा प्रकरणाचा सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलीस तपासात अधिक काय माहिती मिळणार ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा…५० खोके, ५० लोकं, वऱ्हाड निघालं दाओसला ; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
शरद मोहोळ खुन प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात विठ्ठल शेलार याला अटक करण्यात आली आहे. शेलार यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला अन् त्याची पक्षाच्या युवा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्याच दरम्यान मोहोळ याचे मुळशी परिसरात वर्चस्व वाढत असल्याने कंपन्यातील कंत्राटे घेण्यावरून मोहोळ अन् शेलार यांच्यात मोठा वाद झाला. याच वादातून काही महिन्यापूर्वी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील राधा हॉटेल चौकात त्याने गोळीबार केला. याच वादातून शेलार यांनी मोहोळचा काटा काढल्याचे कळत आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी नीट लक्ष देऊन एक तरी खासदार निवडून आणून दाखवावं, कुणी दिलं चॅलेंज ?”
दरम्यान, शरद मोहोळ याच्या खुनाची तयारी काही महिन्यांपासून सुरू होती. यासाठी मुळशीत झाडाच्या बुंध्यावर आरोपींनी गोळीबाराचा सराव देखील केला होता. यात मुन्ना पोळेकर सह इतर सहा जणांचा समावेश होता. याप्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा“मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ मिळाले अन् देवरांना नवे व्हिजन मिळाले”,ठाकरे गटाची जोरदार टीका
हेही वाचा…“महाराष्ट्रात राहून मराठी जणांनी जमीन गमावली तर उद्या…” राज ठाकरेंनी दिला धोक्याचा इशारा
हेही वाचा…गौतमी अदानी ते विविध देशांतील प्रमुखांशी चर्चा, असा असणार मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा
हेही वाचा…श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कल्याणमधून सुषमा अंधारेंना लोकसभेची उमेदवारी द्या, पदाधिकाऱ्यांची ठाकरेंकडे मागणी
हेही वाचा…“शरद पवार गटातील ५ आमदार अन् २ बडे नेते अजिदादांच्या संपर्कात,” शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..