मुंबई : हिवाळी अधिवेशनातील एक व्हि़डीओ ट्विट करत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सेनेचे आमदार अनिल परब यांना खास शुभेच्या दिल्या आहेत. अनिल परब यांचा आज वाढदिवस असून सुषमा अंधारे यांनी ट्विट करत परब यांना वाढदिवसाच्या कडक शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असतांना अनिल परब यांनी विधान परिषदेत बंडखोरांवर निशाणा साधला. तुम्ही सर्वांनी बाळासाहेबांच्या पायावर हात ठेऊन सांगा की, पुढच्या निवडणुका आम्ही भाजपच्या तिकीटावर लढणार नाहीत. 40 आमदारांपैकी किती लोकं भाजपच्या चिन्हावर लढणार, त्याची आम्हाला पुर्ण कल्पना आहे. तुमच्या जीवावर लढून आम्हाला हरवलंत तर तुमचं आम्ही स्वागत करू. आम्ही देखील टोकाचे शिवसैनिक आहोत. असंही अनिल परबांनी म्हटलं होतं. अन् तोच व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी ट्विट केला आहे.
अभ्यासू, लढवय्या आणि किरीट सोमय्या यांना सुद्धा जेरीस आणणार नेतृत्व म्हणजे अनिल परबजी, परब सर आपल्याला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्या असं सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटलं आहे. त्याखाली त्यांनी व्हिडीओ देखील ट्विट केला आहे.
अभ्यासू , लढवय्या आणि किरीट सोमय्या यांना सुद्धा जेरीस आणणार नेतृत्व म्हणजे श्री अनिल परबजी.
परब सर, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎊💐🎉@advanilparab @ShivSena @ShivsenaComms @OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/26hFe1yWND— SushmaTai Andhare (@andharesushama) December 31, 2022
Read also
- धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये”, बावनकुळेंचा एका वाक्यात पवारांचा समाचार
- “स्टाईलमध्ये सिगारेट घेऊन कुणी उभा राहिला तर तो हिरो दिसतो”; फडणवीस गुरूजींनी दिले व्यसनमुक्तीचे धडे
- “अजित पवारांनी एकतर माफी मागावी, नाहीतर…”; तुषार भोसलेंचा अजित पवारांना सज्जड दम
- “गोविंद बागेत कशासाठी अन् केव्हा गेले, हे सांगायची वेळ आणू नका”; राष्ट्रवादीचा शिंदेंना इशारा
- “आमच्यासारख्या राष्ट्रभक्तावर,, मनी लाॅंड्रिंग कायद्याचा गैरवापर,” संजय राऊतांची प्रतिक्रिया