मुंबई : मागील काही वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडल्या आहेत. महापालिका निवडणुका आणि प्रभाग रचना यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे लांबलेल्या महापालिका निवडणुकांचा फैसला होणार का ? याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
नाशिकनंतर औरंगाबादमध्येही रंगत..! अर्ज मागे न घेतल्याने राष्ट्रवादीने पक्षातूनच काढून टाकलं
पुणे, पिंपरी- चिंचवड, मुंबई सह राज्यातील 23 महापालिकांचा कार्यकाळ संपला आहे. या सर्व महापालिकांवर प्रशासकांची नेमणुक करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड या महापालिकांचा कार्यकाळ संपून जवळपास दहा महिने झाले असतानाही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यातच महाविकास आघाडीने केलेली त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला आहे.
“मातोश्रीच्या अंधाऱ्या गुहेत जाणारे पैसेही बाहेरची वाट..;” शितल म्हात्रेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
यातच आता मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीने सेनेत उभी फुट पडली आहे. त्यामुळे याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील सत्ता राखण्यासाठी मोठे कष्ट घेतले जात आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
शिंदे गटावर मोठा अन्याय…! 5 ही मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा स्वत:चा उमेदवार नाही
दरम्यान, शिवसेना कोणाची ? धनुष्यबाण कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणुक आयोगात आज निकाल लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निकाल द्या. किंवा संघटात्मक निवडणुकीची परवानगी द्या. अशी विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे आता सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- शिवसेना नेमकी कुणाची ? ठाकरेंचा पक्षप्रमुख पदही जाणार का? निवडणुक आयोगाकडे महत्वाची सुनावणी
- मोठी बातमी..! दावोस येथे पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला मिळाली 45,900 कोटी रूपयांची गुंतवणुक
- “सेनेतले गेले अन् भाजपमधले आले”, नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
- फडणवीसांशी जेवता जेवता भेट झाली, अन् पुण्यातला माजी नगरसेवक भाजपने गळाला लावला
- “राजकीय फायद्यासाठी चित्रा वाघ यांनी त्रास दिला”, ऊर्फीने थेट महिला आयोगाला पत्र धाडलं, कारवाई करण्याची मागणी