नाशिक : आगामी पाच विभागात होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकांकरीता अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. या सर्वांमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू होती. ऐनवेळी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ.सुधीर तांबे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेने आता अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता ही लढत सत्यजित तांबे, शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले यांच्यात होणार आहे.
“उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात, शिवसेना रडणारी कधीच नव्हती”
याआधी काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी डॉ.सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र सुधीर तांबे यांनी या निवडणुकीसाठी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांचा अपक्ष म्हणून अर्ज केला. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यातच मग काॅंग्रेसने पक्षाविरूद्ध कारवाया केल्यामुळे सुधीर तांबे यांना काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे.
“…म्हणून आदित्य ठाकरे यांची आरोपांची आदळआपट सुरू झालीय”
तर आज सकाळपासून अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल होत्या. मात्र काही तासांपुर्वी त्या समाज माध्यमांसमोर आल्या. तसेच शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा. असा प्रयत्न भाजपने केल्याचा आरोप होता. तो आता अयशस्वी झाला आहे. या निवडणुकीकरीता भाजपचे समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. तसेच पाचही मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा स्वत:चा उमेदवार निवडणुकीकरीता उभा नाही.
मोदींची BKC वर 19 जानेवारीला सभा..! भाजपला 1 लाख तर शिंदे गटाला 50 हजार कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट
दरम्यान, नागपुरमध्ये भाजपचे वर्तमान आमदार नागो गाणार आणि काॅंग्रेसच्या सुधाकर आडबोले यांच्यात लढत होणार आहे. तर अमरावती पदवीधर मतदारसंघात अमरावतीची जागा महाविकास आघाडीमधील काॅंग्रेसने मिळवली असून काॅंग्रेसकडून धीरज लिंगाडे आणि भाजपचे विद्यमान आमदार रणजित पाटील यांच्यात होणार आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून शेकापचे नेते, विद्यामान आमदार बाळाराम पाटील हे आघाडीकडून तर त्यांच्याविरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे उतरले आहेत. तर औरंगाबाद शिक्षक मतदार संगात राष्ट्रवादीकडून आमदार विक्रम काळे आणि भाजपकडून किरण पाटील अशी लढत होणार आहे.
Read also
- “राऊतांना आवडणारा उकीरडा कोण, हे सांगण्याची गरज आहे का?” भाजपने संजय राऊतांना डिवचलं
- “गद्दारांनी स्वत:ला विकलं आता आमच्या मुंबईला विकू नका”
- “केवळ कल्पना नको कृतीतून महागाईला ब्रेक लावा”; राष्ट्रवादीने केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुनावलं
- “अमितभाई शहाच्या आशीर्वादाने मोदी साहेबाला टक्कर देणारे एकमेव नेते म्हणजे शिंदे साहेब”
- “सुनबाई आली तर तिला म्हणाव एक मुलगा अन् एक मुलगी एवढ्यावरच थांब” अजित पवार