मुंबई : दावोसमधून काय येतंय ते माहित नाही. पण तुमच्या नाकाखालून अनेक उद्योग गेले. त्यामुळे दावोसला जाण्याआधी गुजरातला जा. राज्यातील गेलेले प्रकल्प परत आणा. तुमच्या नाकाखालून गेलेेले प्रकल्प परत आणा, अशी खोचक टिप्पणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला रवाना झाले आहेत. त्यावरून त्यांनी टीका केली. त्यावरून आता भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
“…म्हणून आदित्य ठाकरे यांची आरोपांची आदळआपट सुरू झालीय”
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांवर जी हलकट प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून मला एक म्हण आठवली. गाढवाला गुळाची चव काय? त्याला उकीरडाच आवडणार. राऊतांना आवडणारा उकीरडा कोण, हे सांगण्याची गरज आहे का? असा सवाल ही करत संजय राऊतांना भातखळांनी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
मोदींची BKC वर 19 जानेवारीला सभा..! भाजपला 1 लाख तर शिंदे गटाला 50 हजार कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट
तर काय म्हणता संजय राऊत साहेबांना दावोसचं महत्वाचं नाही? युवराज आदित्य ठाकरे काय पर्यटनाला गेले होते तिथे ? आठवतंय का काही. दावोस दौरा का लांबवला होता. तेही जरा सांगा. उगाचच देऊ नका नुसत्या सकाळ संध्याकाळ बागा. तुमच्या कुकर्मामुळे प्रकल्प बाहेर गेले. मुख्यमंत्र्यांच्या कामाने डोळे दिपले असं अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी दावोस दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यावर जी हलकट प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून मला एक म्हण आठवली…
गाढवाला गुळाची चव काय?
त्याला उकीरडाच आवडणार…
राऊतांना आवडणारा उकीरडा कोण,
हे सांगण्याची गरज आहे का?@mieknathshinde
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 16, 2023
Read also
- “गद्दारांनी स्वत:ला विकलं आता आमच्या मुंबईला विकू नका”
- “केवळ कल्पना नको कृतीतून महागाईला ब्रेक लावा”; राष्ट्रवादीने केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुनावलं
- “अमितभाई शहाच्या आशीर्वादाने मोदी साहेबाला टक्कर देणारे एकमेव नेते म्हणजे शिंदे साहेब”
- “सुनबाई आली तर तिला म्हणाव एक मुलगा अन् एक मुलगी एवढ्यावरच थांब” अजित पवार
- “उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात, शिवसेना रडणारी कधीच नव्हती”