पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांची टोलेबाजी सगळ्यांनाच माहिती आहे. यातच त्यांनी बारामती येथील एका कार्यक्रमात लोकसंख्या वाढीसंदर्भात महिलांना आणि पुरूषांना अजब सल्ला दिला आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार यांचाही संदर्भ दिला आहे.
“सरकार शोबाजीत जास्त व्यस्त, नवे करण्याची मानसिकता राहिली नाही”; राष्ट्रवादीची खोचक टिका
बारामती येथील ऋतुराज काळे मित्रमंडळातर्फे गरजू महिलांना साडी, स्वेटर, शिलाई मशिन व अन्य साहित्य वाटप अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आता इथे तुम्ही सर्व महिला आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगतोस, तुम्हाला आवडो अगर न आवडो. आपली सुनबाई आली तर तिला म्हणाव एक मुलगा आणि एक मुलगी एवढ्यावरच थांब. कसला वंशाचा दिवा अन् कसला काय? पवार साहेब देखील फक्त सुप्रिया सुळे एवढ्यावरच थांबले. असं म्हणत अजित पवार यांनी लोकसंख्या वाढीसंदर्भात चांगलीच टोलेबाजी केली.
सोमय्यांचे पुतळे जाळले, टाळ्या वाजवल्या, घोषणाबाजी दिली, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
वंशाच्या दिव्यासाठी देवाची कृपा, अरे कुणाची कृपा माहीत नाही का आम्हाला? त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, दोन अपत्यांवर थांबा. गमतीचा विषय सोडून द्या, पण खरोखरच ही महत्वाची गोष्ट आहे. असं म्हणत त्यांनी यावेळी शरद पवार यांचाही उदाहरण दिला.
Read also
- “उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात, शिवसेना रडणारी कधीच नव्हती”
- “…म्हणून आदित्य ठाकरे यांची आरोपांची आदळआपट सुरू झालीय”
- मोदींची BKC वर 19 जानेवारीला सभा..! भाजपला 1 लाख तर शिंदे गटाला 50 हजार कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट
- “सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता”; शरद पवारांनी केली नाराजी व्यक्त
- “बच्चू कडूंनी घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना?” राष्ट्रवादीला संशय