नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ऐनवेळी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी आघाडीसोबत बंडखोरी केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यामुळे काॅंग्रेसने त्यांच्यावर निलंबणाची कारवाईही केली असून राज्यातील इतर नेत्यांनी काॅंग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपली नाराजी उघडपणे बोलून दाखविली आहे.
“पदवीधर निवडणुकीतील तिकीटावरून भाजप-शिंदे गटात धुसफुस, अनेकांची नाराजी
राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे औरंगाबादची जागा, नागपुरची जागा शिवसेनेला आणि अमरावती आणि नाशिकची उमेदवारी काॅंग्रेसला देण्याचा निर्णय झाला होता. नाशिक पदवीधर मतदारसंघातील सध्याचे चित्र पाहता काळजी करण्यासारखेच आहे. हा विषय नीट हाताळता आला असता काॅंग्रेसने ज्यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यांचे काम आणि सर्वांना बरोबर घेण्याची भूमिका चांगली आहे. मात्र तरूण कार्यकर्त्यांचा अर्ज आल्यानंतर चर्चेने हा प्रश्न सोडविता आला असता. अस शरद पवार यांनी सांगितलं.
कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. ते युवक चळवळीशी सक्रिय आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांनी आपासपसात चर्चा करून प्रश्न सोडविणे अवघड नव्हते. बाळासाहेब थोरात पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. विधिमंडळाचे ते गटनेता आहेत. टोकाची भूमिका ते घेत नाहीत. त्यामुळे सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता. असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघाची जागा आघाडीने काॅंग्रेसला सोडली. परंतु काॅंग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांना अपक्ष अर्ज भरायला मदत केली. त्यामुळे त्यांच्यावर आघाडीतील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
Read also
- “बच्चू कडूंनी घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना?” राष्ट्रवादीला संशय
- “सरकार शोबाजीत जास्त व्यस्त, नवे करण्याची मानसिकता राहिली नाही”; राष्ट्रवादीची खोचक टिका
- सोमय्यांचे पुतळे जाळले, टाळ्या वाजवल्या, घोषणाबाजी दिली, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
- “गिरीश महाजांनाना ते क्रेडीट घेण्याची गरज नाही”; बंडखोर आमदारांचा गिरीश महाजनांना टोला
- “तुम्हीच आमच्या मनातील मुख्य़मंत्री..!” फडणवीसांकडे बोट दाखवून नवनीत राणांचं वक्तव्य