पुणे : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्षांतील नेत्यांनी केली. यातच 16 जानेवारी पासून दावोस येथे आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषद होत आहे. या परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दावोस याठिकाणी गेले. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी खोचक टोला हाणला आहे.
“बच्चू कडूंनी घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना?” राष्ट्रवादीला संशय
स्वित्झर्लंड देशातील दावोस येथे आंतरराष्ट्रीय आर्थिक फोरमच्या विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी आज प्रयाण करत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राची भूमिका मांडताना 20 उद्योगांसोबत 1 लाख 40 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जास्तीत जास्त परदेशी गुंतवणुक व्हावी, यासाठी संपुर्णपणे प्रयत्नशील राहीन, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
“सरकार शोबाजीत जास्त व्यस्त, नवे करण्याची मानसिकता राहिली नाही”; राष्ट्रवादीची खोचक टिका
त्यावरून आता सुरज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दावोस दौऱ्याला जात आहेत. आल्यानंतर गुंतवणुकीचे आकडे ऐकायची तयारी ठेवा. अमित शाई शहाच्या आशीर्वादाने मोदी साहेबाला टक्कर देणारे एकमेव नेते आहेत शिंदे साहेब. असंही त्यांनी ट्विट केलं आहे.
सोमय्यांचे पुतळे जाळले, टाळ्या वाजवल्या, घोषणाबाजी दिली, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
दावोस दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील जाणार होते. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौरा रद्द केला आहे. यावेळी नरेंद्र मोदी विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दावोस दौऱ्याला जात आहेत आल्यानंतर गुंतवणुकीचे आकडे ऐकायची तयारी ठेवा.अमित भाई शहाच्या आशीर्वादाने मोदी साहेबाला टक्कर देणारे एकमेव नेते आहेत शिंदे साहेब.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) January 16, 2023
Read also
- “सुनबाई आली तर तिला म्हणाव एक मुलगा अन् एक मुलगी एवढ्यावरच थांब” अजित पवार
- “उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात, शिवसेना रडणारी कधीच नव्हती”
- “…म्हणून आदित्य ठाकरे यांची आरोपांची आदळआपट सुरू झालीय”
- मोदींची BKC वर 19 जानेवारीला सभा..! भाजपला 1 लाख तर शिंदे गटाला 50 हजार कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट
- “सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता”; शरद पवारांनी केली नाराजी व्यक्त