मुंबई : मुंबई महानगरपालिकेत आर्थिक बेशिस्ती वाढली आहे. पालिकेत प्रशासन आहे, मात्र निर्णय मुख्यमंत्र्यांना विचारून घेतले जातात, जे घटनाबाह्य आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात काॅंक्रिटीकरण झालं आहे, पुन्हा मुंबी तुंबली तर जबाबदार कोण? स्वत:ला विकलं, मुंबईला विकू नका. अशी घणाघाती टिका शिवसेनेचे युवा आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यावर आता शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी त्यावर टिप्पणी केली आहे.
“सुनबाई आली तर तिला म्हणाव एक मुलगा अन् एक मुलगी एवढ्यावरच थांब” अजित पवार
काळ्या यादीतले कंत्राटदार मातोश्रीच्या दाराने पांढऱ्या कसे येतात ते जाहीर करा. वाघाच्या गुहेत जाणारी पावले दिसतात. येणारी दिसत नाहीत. मातोश्रीच्या अंधाऱ्या गुहेत जाणारे पैसेही बाहेरची वाट दिसतात. असं म्हणत शितल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.
“उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात, शिवसेना रडणारी कधीच नव्हती”
रस्त्यांचे काॅंक्रिटीकरण करताना आर्थिक घोटाळा तर होत आहेच पण वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. असं म्हणत नगरसेवक, लोकप्रतिनीधी नसताना 400 किमी रस्ते बनवायला कोणी सांगितले. असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मी प्रत्येक पक्षाला विचारत आहे, ज्यांनी महापालिकेमध्ये काम केलं आहे. त्यांना सध्या जे महापालिकेमध्ये चालू आहे ते पटतंय का? राजकारण बाजूला ठेवून वैयक्तिकरित्या स्वत:तच मत मांडावं असं आदित्य ठाकरे यांनी त्यांना आव्हान केलं आहे.
“…म्हणून आदित्य ठाकरे यांची आरोपांची आदळआपट सुरू झालीय”
लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी नसताना 400 किमी रस्त्यांच्या 6000 कोटींच्या कामाचा निर्णय प्रशासक कसे घेऊ शकतात. गद्दारांनी स्वत:ला विकलं आता आमच्या मुंबईला विकू नका. कंत्राटदारांच्या निविदा पाहिल्या तर सगळं ठरवून झाल्याचं सिद्ध होत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. मुंबईकर म्हणून विचार करा, मुंबईकरांच्या पैशांचा गैरवापर होत आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
काळ्या यादीतले कंत्राटदार मातोश्रीच्या दाराने पांढ-या यादीत कसे येतात ते जाहीर करा…
वाघाच्या गुहेत जाणारी पावले दिसतात, येणारी दिसत नाहीत. मातोश्रीच्या अंधा-या गुहेत जाणारे पैसेही बाहेरची वाट विसरतात…. pic.twitter.com/KWpFOUl5U7— sheetal mhatre (@sheetalmhatre1) January 16, 2023
Read also
- शिंदे गटावर मोठा अन्याय…! 5 ही मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा स्वत:चा उमेदवार नाही
- “राऊतांना आवडणारा उकीरडा कोण, हे सांगण्याची गरज आहे का?” भाजपने संजय राऊतांना डिवचलं
- “गद्दारांनी स्वत:ला विकलं आता आमच्या मुंबईला विकू नका”
- “केवळ कल्पना नको कृतीतून महागाईला ब्रेक लावा”; राष्ट्रवादीने केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुनावलं
- “अमितभाई शहाच्या आशीर्वादाने मोदी साहेबाला टक्कर देणारे एकमेव नेते म्हणजे शिंदे साहेब”