पुणे : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्यावेळी काॅंग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी बंडाळी केल्याने राजकीय समीकरण बदललं. त्यानंतर काॅंग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांना काॅंग्रेसकडून बडतर्फ करण्याची घोषणा केली. यातच आता पुण्यात देखील काॅंग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. पुण्यातील काॅंग्रेसचा एक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याने एकच चर्चा रंगली आहे.
“गद्दारांनी स्वत:ला विकलं आता आमच्या मुंबईला विकू नका”
ऐनवेळी डॉ. सुधीर तांबे यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत बंडखोरी केल्याने मोठा गोंधळ उडाला. यातच आता काॅंग्रेसचे एक ज्येष्ठ माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतल्याचं समजत आहे. त्यामुळे नगरमधील तांबे पिता-पुत्राच्या उमेदवारी प्रकरणानंतर आता पुण्यातही काॅंग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे.
“केवळ कल्पना नको कृतीतून महागाईला ब्रेक लावा”; राष्ट्रवादीने केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुनावलं
दक्षिण पुण्यातील एका ज्येष्ठ नगरसेवकाने गेल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस हे सहकारनगर भागातील त्यांच्या काकांच्या घरी भोजनासाठी गेले होते. त्या वेळही भेट झाल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य भाजपकडून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळेच या माजी नगरसेवकाने फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
“अमितभाई शहाच्या आशीर्वादाने मोदी साहेबाला टक्कर देणारे एकमेव नेते म्हणजे शिंदे साहेब”
दरम्यान, महापालिका निवडणुका आणि प्रभाग रचना यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आज म्हणजे मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे लांबलेल्या महापालिका निवडणुकांचा फैसला होणार का? याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबईसह राज्यातील 23 महापालिकांचा कार्यकाळ संपला आहे. यासर्व महापालिकांवर प्रशासकांची नेमणुक करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिकांचा कार्यकाळ संपून जवळपास दहा महिने झाले असतानाही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यातच महाविकास आघाडीने केलेली त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला आहे.
Read also
- “राजकीय फायद्यासाठी चित्रा वाघ यांनी त्रास दिला”, ऊर्फीने थेट महिला आयोगाला पत्र धाडलं, कारवाई करण्याची मागणी
- नाशिकनंतर औरंगाबादमध्येही रंगत..! अर्ज मागे न घेतल्याने राष्ट्रवादीने पक्षातूनच काढून टाकलं
- “मातोश्रीच्या अंधाऱ्या गुहेत जाणारे पैसेही बाहेरची वाट..;” शितल म्हात्रेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
- शिंदे गटावर मोठा अन्याय…! 5 ही मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा स्वत:चा उमेदवार नाही
- “राऊतांना आवडणारा उकीरडा कोण, हे सांगण्याची गरज आहे का?” भाजपने संजय राऊतांना डिवचलं