नाशिक : आगामी पाच विभागात होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकांकरीता अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. या सर्वांमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू होती. ऐनवेळी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ.सुधीर तांबे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेने आता अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता ही लढत सत्यजित तांबे, शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले यांच्यात होणार आहे. तर पक्षाविरूद्ध कारवाया केल्याप्रकरणी राष्ट्रवादीने औरंगाबादचे उमेदवार प्रदीप साळुंखे यांना निलंबित केलं आहे.
“अमितभाई शहाच्या आशीर्वादाने मोदी साहेबाला टक्कर देणारे एकमेव नेते म्हणजे शिंदे साहेब”
आज शिक्षक आणि पदवीधर विधानसभेच्या निवडणुकीकरीता उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यातच औरंगाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप साळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्यांना राष्ट्रवादीकडून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीने औरंगाबाद येथे आमदार विक्रम काळे आणि भाजपकडून किरण पाटील यांच्यात लढत होणार आहे. प्रदीप साळुंगे यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केलेला आरोप ठेवण्यात आला आहे.
“सुनबाई आली तर तिला म्हणाव एक मुलगा अन् एक मुलगी एवढ्यावरच थांब” अजित पवार
आज सकाळपासून अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल होत्या. मात्र काही तासांपुर्वी त्या समाज माध्यमांसमोर आल्या. तसेच शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा. असा प्रयत्न भाजपने केल्याचा आरोप होता. तो आता अयशस्वी झाला आहे. या निवडणुकीकरीता भाजपचे समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. तसेच पाचही मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा स्वत:चा उमेदवार निवडणुकीकरीता उभा नाही.
“उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात, शिवसेना रडणारी कधीच नव्हती”
दरम्यान, नागपुरमध्ये भाजपचे वर्तमान आमदार नागो गाणार आणि काॅंग्रेसच्या सुधाकर आडबोले यांच्यात लढत होणार आहे. तर अमरावती पदवीधर मतदारसंघात अमरावतीची जागा महाविकास आघाडीमधील काॅंग्रेसने मिळवली असून काॅंग्रेसकडून धीरज लिंगाडे आणि भाजपचे विद्यमान आमदार रणजित पाटील यांच्यात होणार आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून शेकापचे नेते, विद्यामान आमदार बाळाराम पाटील हे आघाडीकडून तर त्यांच्याविरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे उतरले आहेत.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी श्री. @mlcvikramkale यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी काळे यांचा अधिकृतरीत्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. #NCP pic.twitter.com/fH3SaHKSVD
— NCP (@NCPspeaks) January 16, 2023
Read also
- “मातोश्रीच्या अंधाऱ्या गुहेत जाणारे पैसेही बाहेरची वाट..;” शितल म्हात्रेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
- शिंदे गटावर मोठा अन्याय…! 5 ही मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा स्वत:चा उमेदवार नाही
- “राऊतांना आवडणारा उकीरडा कोण, हे सांगण्याची गरज आहे का?” भाजपने संजय राऊतांना डिवचलं
- “गद्दारांनी स्वत:ला विकलं आता आमच्या मुंबईला विकू नका”
- “केवळ कल्पना नको कृतीतून महागाईला ब्रेक लावा”; राष्ट्रवादीने केंद्रीय अर्थमंत्र्यांना सुनावलं