बंगळुरू : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बंगळुरू येथे बैठक सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधातील जवळपास ३० पक्ष एकजूट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. या बैठकीसाठी राज्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काॅंग्रेसचे नेते बैठकीसाठी उपस्थित राहिले आहेत. यातच आता या आघाडीचं नाव ठेवण्याचा प्रस्ताव खासदार राहुल गांधी यांनी ठेवला असता. त्यांना सर्वांनी अनुमोदन दिलं आहे.
हेही वाचा…सोमय्यांचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल, नालायक सोमय्यांचा धिक्कार असो, विरोधकांच्या जोरदार घोषणा
आज सकाळीच शरद पवार बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी उपस्थित झाले. यावेळी काॅंग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सिपीआय नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे नेते खा. डेरेक ओ ब्रायन आणि विविध विरोधी पक्षांच्या मान्यवरांसोबत भेटीगाठी झाल्या. यावेळी उपस्थित सर्व नेत्यांकडून एकत्र लढू आणि जिंकू असा निर्धार करण्यात आला. असं शरद पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“शरद पवारांच्या भूमिकेवर शंका घेऊ नका, राष्ट्रवादी अजूनही विरोधी पक्षात ,” जयंत पाटलांची प्रतिक्रिया
दरम्यान, बंगळुरू येथे सुरू असणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत, या आघाडीचं नाव INDIA ठेवण्याचा प्रस्ताव खासदार राहुल गांधी यांनी मांडला. त्यांच्या या कल्पकतेच प्रचंड कौतुक. सर्व पक्षांनी याला अनुमोदन देत आगामी लोकसभा निवडणूक INDIA या नावाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे. I – Indian N – National D – Democratic I – Inclusive A – Alliance Let’s save idea of INDIA. Let’s save Democracy of INDIA असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
बंगळुरू येथे सुरू असणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत,या आघाडीचं नाव INDIA ठेवण्याचा प्रस्ताव @RahulGandhi यांनी मांडला.त्यांच्या या कल्पकतेच प्रचंड कौतुक.सर्व पक्षांनी याला अनुमोदन देत आगामी लोकसभा निवडणूक INDIA या नावाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
I – Indian
N -…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सोमय्यांचा विषय सभागृहात गाजला, ठाकरेंच्या वाघांनी थेट हल्लाच केला, दानवेंनी थेट पेन ड्राईव्ह दिला
हेही वाचा…“सोमयांचा व्हिडीओ आत्ताच का यावा ? भाजपने किरीट सोमय्यांचा बळी दिला”
हेही वाचा…“हवं तर यांना मंत्री करा, बच्चू कडूंनी मंत्रिपदाचा दावा सोडला”, मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर जाहीर केली भूमिका
हेही वाचा…“राज्याचं विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसच्या तरूणाकडे द्या,” राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी
हेही वाचा…“किरीट सोमय्या, नागडा तर तु झाला आहेस, सभागृहात पेन ड्राईव्ह देणार,” ‘या’ नेत्याना दिला इशारा