मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून सरकारमध्ये सामील झालेत. यानंतर काका तुमचं वय ८३ झालं आहे. तुम्ही थांबणार आहात की नाही? असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केला. त्यानंतर माझं वय झालंय खरं, पण गडी काय आहे, तुम्हाला माहिती आहे का ? असा उलट सवाल शरद पवारांनी केला. त्यानंतर अनेक चर्चा झाल्यात.
हेही वाचा…अजित पवार विरूद्ध शरद पवार, व्हीप कुणाचा मानायचा? राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रश्न
यातच मध्यंतरी राष्ट्रवादीचे आमदारा रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांविरोधात एक ट्विटवर मोहिम चालवली होती. त्यानंतर त्यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं होतं. यातच आता राष्ट्रवादीच्या बंडानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसकडे जाणार असून हे विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसच्या तरूण वर्गाला दिलं पाहिजे. अशी भूमिका रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मांडली आहे.
हेही वाचा…“..तर दादांच्या गटाला दारातूनच गेटलॉस्ट केलं असतं”, संजय राऊतांनी अजित पवारांना डिवचलं
दरम्यान, रोहित पवारांनी ट्विट करून याबाबत भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वय या विषयावर खूप चर्चा झाली. पण वय कमी असो किंवा जास्त काम करण्यासाठी वय कधीही वय मॅटर करत नाही, ही माझी ठाम भूमिका आहे. युवांना कुणीही कमी समजू नये, त्यांना संधी मिळाली पाहिजे. माझी तर काॅंग्रेस पक्षालाही विनंती राहील की, त्यांच्याकडेही मोठी क्षमता असलेले अनेक युवा आमदार आहेत. त्यापैकी एखाद्याला विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद मिळालं तर तेही निश्चित कर्तत्व दाखवतील, असा विश्वास आहे. असं रोहित पवारांनी म्हटलंय.
गेल्या काही दिवसांपासून #वय या विषयावर खूप चर्चा झाली… पण वय कमी असो किंवा जास्त काम करण्यासाठी वय कधीही मॅटर करत नाही, ही माझी ठाम भूमिका आहे. युवांना कुणीही कमी समजू नये, त्यांना संधी मिळाली पाहिजे. माझी तर काँग्रेस पक्षालाही विनंती राहील की, त्यांच्याकडेही मोठी क्षमता असलेले…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“किरीट सोमय्या, नागडा तर तु झाला आहेस, सभागृहात पेन ड्राईव्ह देणार,” ‘या’ नेत्याना दिला इशारा
हेही वाचा…सोमय्यांचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल, नालायक सोमय्यांचा धिक्कार असो, विरोधकांच्या जोरदार घोषणा
हेही वाचा…“शरद पवारांच्या भूमिकेवर शंका घेऊ नका, राष्ट्रवादी अजूनही विरोधी पक्षात ,” जयंत पाटलांची प्रतिक्रिया
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ३० आमदार आले तसे गेले, शरद पवारांनी एका वाक्यात विषय मिटवला
हेही वाचा…*“बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा आणणार,” कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा*