मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मन वळवण्यासाठी दुसऱ्यांदा त्यांची भेट घेतली आहे. अजित पवार हे सोमवारी दुपारी त्यांच्या गटाच्या ३० आमदारांना घेऊन यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरुवातीला शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात जवळपास पाऊणतास बैठक झाली. यावर आता खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीत काही तरी शिजतयं, अजित पवारांसह सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला
शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा, त्यांच्या नेत्यांचा स्वभाव वेगळा आहे. शिवसेनेचा स्वभाव लढवय्या आहे रस्त्यावर उतरून लढाी करणं, हे आम्ही जाणतो. याउलट राष्ट्रवादीचा स्वभाव संयमी आहे. खूप विचार करून निर्णय घेतात, नागीगोती जपतात. ज्यांनी प क्षाच्या विरोधात, विचारांच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्यासाठी आमची दारे बंद असतात. जर आम्ही काल पवारसाहेबांच्या जागी असतो तर दादांच्या गटाला दारात उभं केलं नसंत किंबहुना गेटलॉस्ट केलं असतं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, विप्लव बजोरी यांना अपात्र करा, ठाकरे गटाचं विधीमंडळ सचिवांना पत्र
दरम्यान, आले दारात घुसले, खरोखर घुसले, माझ्या माहितीप्रमाणे ते वेळ न घेता दारात घुसले. आपल्या आमदारकी जाईल, पवारसाहेब आपल्या पाठिशी नसतील तर लोक आपल्याला जोडे मारतील, ही भीती फुटलेल्या नेत्यांमध्ये आहे. पण सध्या राष्ट्रवादीने त्यांच्या विरोध आणि त्यांच्या भूमिका या प्रखर कृतीतून दाखविण्याची गरज आहे. ज्यांनी बेईमानी केली, ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पक्षाविरोधात जाऊन पाऊल उचललं, त्यांना आम्ही आमच्या दारात प्रवेश देत नाही, पण सगळेच पक्ष किंवा त्यांचे नेते हे शिवसेनेप्रमाणे वागतील. असं नाही. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…उपसभापतींना अपात्र करा, विरोधकांच्या मागणीनंतर आता निलम गोऱ्हे म्हणाल्या की, “मी चर्चेला वेळ…”,
हेही वाचा…“शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, अन्…”, शरद पवारांच्या भेटीनंतर पटेलांनी दिली मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…डझनभर विरोधी पक्षातील नेते राजभवनावर पोहचले, राज्यपालांकडे केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…अजित पवार गटाची शरद पवारांसोबत ४५ मिनिटं चर्चा, बैठकीत काय झालं ? अजित पवार गटांनी दिली माहिती
हेही वाचा…राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकवटले…! शरद पवारांच्या भेटीला, मोठा राजकीय भुकंप होणार ?