मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर उभं राहून शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. तर विधान परिषदेतील आमदार उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरोधात आक्रमक झाला. त्यानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकुब करण्यात आलं. तर त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनावर भेट घेतली.
हेही वाचा…मुंबई महापालिकेत २६३ कोटींचा भ्रष्टाचार, आदित्य ठाकरेंचा आरोप, चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात महाविकास आघाडीच्या सोबत असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकतीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेऊन त्यासंदर्भात निवेदन दिले.
हेही वाचा…देशात सत्ताधारीच्या बाजूने ३० तर विरोधी पक्षांकडून २४ पक्ष एकवटणार, बैठक सत्रांचं आयोजन
दरम्यान, यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काॅंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री आमदार अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात महाविकास आघाडीच्या सोबत असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंदर्भात आज माननीय राज्यपाल महोदय रमेश बैस जी यांना… pic.twitter.com/JKnvje5MD8
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) July 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटाची शरद पवारांसोबत ४५ मिनिटं चर्चा, बैठकीत काय झालं ? अजित पवार गटांनी दिली माहिती
हेही वाचा…राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकवटले…! शरद पवारांच्या भेटीला, मोठा राजकीय भुकंप होणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादीत काही तरी शिजतयं, अजित पवारांसह सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला
हेही वाचा…मोठी बातमी..! निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, विप्लव बजोरी यांना अपात्र करा, ठाकरे गटाचं विधीमंडळ सचिवांना पत्र
हेही वाचा…माढ्यात भाजपला डोकेदुखी, मोहिते पाटील विरुद्ध खासदार निंबाळकर वाद पेटणार? नेमकं काय घडलं?