पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा कायापालट करणारी योजना म्हणून कृष्णा-भीमा स्थिरीकरणावरून योजनेला पाहिले जाते. २०१९ साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या योजनेसाठी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितलं होत. माहिते पाटील यांच्या पाठबळावर भाजपने माढा लोकसभेची जागा देखील जिंकली. मात्र आता माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेवरून सुप्त संघर्ष निर्माण होताना दिसत आहे.
हेही वाचा…“शरद पवार आपली नातीगोती विसरून आमदारांच्या निलंबणाचा निर्णय घेतील”
गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत सागर बंगल्यात बैठक पार पडली. या बैठकीला अधिकाऱ्यांसह माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह आमदार जीवन गोरे, राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आदी आमदार उपस्थित होते. बैठकीत या प्रकल्पाला फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली आहे.
हेही वाचा…“अजित दादा दबंग नेता वगैरे काही नाही,” एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर जोरदार टोलेबाजी
या योजनेची संकल्पना मांडणारे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार असताना देखील बैठकीस अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. आता भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता निशाना साधला आहे. “आम्हाला थेट भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी देणेघेणे आहे, काहीजण केवळ मिडिया आणि पेपरबाजी करताना दिसत आहेत. ही योजना काय? पाणी किती? वाटप कसे होणार? हे यांना माहित नाही. गावांची नावे माहित नसलेली ही व्यक्ती आहे” अशी टीका धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलीय.
हेही वाचा…आगामी निवडणुकांसाठी ‘शरद पवारांचा’ मेगा प्लॅन, ‘या’ नेत्यांकडे दिल्या मोठ मोठ्या जबाबदाऱ्या
माढा लोकसभेवरून भाजपमध्ये संघर्ष?
२०१९ साली विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. माढा लोकसभा मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे. याच बळावर भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाल्याचा दावा केला जातो. तर माळशिरस विधानसभेला देखील भाजपचा विजय झाला होता. दरम्यान, आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेवरून मोहिते पाटील आणि निंबाळकरांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबई महापालिकेत २६३ कोटींचा भ्रष्टाचार, आदित्य ठाकरेंचा आरोप, चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
हेही वाचा…देशात सत्ताधारीच्या बाजूने ३० तर विरोधी पक्षांकडून २४ पक्ष एकवटणार, बैठक सत्रांचं आयोजन
हेही वाचा…“विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांना निलंबित करा,” ठाकरे गटाच्या नेत्यांची मोठी मागणी
हेही वाचा…अजित पवाराचं बंड, शिंदे सरकारचं पावसाळी अधिवेशन, कोणी गाजवलं आजचा दिवस ?
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ, लवकरच होणार घोषणा