मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला. तर त्याधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी देत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभात्याग केला.
हेही वाचा…“हे हल्ले आम्ही खपवून घेणार नाहीत,” रोहित पवारांनी दिला कडक इशारा
विरोधकांनी पहिल्याच दिवशी शिंदे सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सभागृहात वाचा फोडत त्यांनी सभात्याग केला. यावेळी सभागृहात मोठा गोंधळ देखील बघायला मिळाला. यातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिलं जाईल. असं काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा…“राज्यात लवकरच काॅंग्रेसचं स्थिर सरकार येईल,” ‘या’ महिला आमदारानी व्यक्त केला विश्वास
राज्यात अत्यंत कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष नसल्याचं सांगत थोरातांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तर दुबार पेरणीचं संकट आल्यास सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आल्यास सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिल. बोगस बियाणा संदर्भात कडक कारवाई करू. सरकारकडून शेतकऱ्यांना १० हजार कोटीचीं मदत देण्यात आली असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंना फोन केला अन्, सिल्वर ओकवर.. “,अजित पवारांनी सांगितली इनसाईट स्टोरी
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड केल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले. आज सभागृहात जयंत पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे आमदार विरोधी बाकावर बसले. तर अजित पवार यांचे समर्थक आमदार सत्ताधारी बाकावर बसले होते. त्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी दिल्याने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह तहकुब करण्याचा निर्णय घेतला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ, लवकरच होणार घोषणा
हेही वाचा…“शरद पवार आपली नातीगोती विसरून आमदारांच्या निलंबणाचा निर्णय घेतील”
हेही वाचा…“अजित दादा दबंग नेता वगैरे काही नाही,” एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर जोरदार टोलेबाजी
हेही वाचा…आगामी निवडणुकांसाठी ‘शरद पवारांचा’ मेगा प्लॅन, ‘या’ नेत्यांकडे दिल्या मोठ मोठ्या जबाबदाऱ्या
हेही वाचा…“अजित दादा आता हिंदू सकल मोर्चात पण दिसतील”, भाजप आमदाराचा बडा दावा