नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिंदे-फडणवीस यांच्या सत्तेत सहभागी झालेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ९ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. यातच अजित पवारांनी राष्ट्रवादीवर दावा ठोकल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. यातच आता अजित पवार शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर गेल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
हेही वाचा…“इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचा, चेसी बारामती..”, रोहित पवारांनी डिवचलं
अजित पवार नाशिक येथे आले असता. त्यांनी यावर भाष्य केलं आहे. काल काकीचं ऑपरेशन झालं. त्यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे काल भेट घेणार होतो. मात्र खाते वाटपाचा निर्णय होत असल्याने मंत्रालयात, विधानभवनात होतो. तिथून निघाल्यानंतर थेट सुप्रिया सुळेंना फोन केला. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, मी आता सिल्वर ओकवर निघाले आहे.
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री पद द्या, नाहीतर अर्थमंत्री पद, असा दिल्लीत होता प्रस्ताव “
काम झाल्यावर मी देखील सिल्वर ओकवर गेलो. त्यामुळे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि कुटुंब कुटुंबाच्या ठिकाणी आहे. आपली भारतीय संस्कृती असून परिवाराला आपण पहिल्यांदा महत्व देतो. सिल्वर ओकवर अर्धा तास थांबलो. सर्वांशी भेट घेतली. माझ्या अंतर्मनानं सांगितलं की तिथं गेलं पाहिजे. म्हणून मी गेलो, शरद पवार साहेब तिथं होते असंही ते म्हणाले. प्रतिभाताई पवार यांच्या पायांच्या पोटांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ते पाहण्यासाठी अजित पवार सिल्वर ओकवर गेले होते.
READ ALSO :
हेही वाचा…“सचिन तेंडुलकर करत असलेल्या ‘त्या’ जाहिरातीवर बंदी आणा,” बच्चू कडूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हेही वाचा…“.. त्यावेळी कोणत्याही नेत्यांचे फोन आले नाहीत पण..,” मिटकरींनी धनंजय मुंडेंची सांगितली जुनी आठवण
हेही वाचा…“शरद पवारांनी किती घर फोडली, सरकारं अस्थिर केली, हाच डाव…”, भाजपची राष्ट्रवादीवर जहरी टिका
हेही वाचा…“अजित दादांना मोदींचं काम आवडलं अन्…”, एकनाथ शिंदेंची नाशकात टोलेबाजी
हेही वाचा…“लोकांच्या पोटदुखीवर डॉ.एकनाथ शिंदे, अन् अजित पवार”, नाशकातून फडणवीसांची जोरदार फटकेबाजी