बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचाही सहभाग आहे. यातच आता धनंजय मुंडे यांना कृषी मंत्रिपद देण्यात आलं. आज धनंजय मुंडे यांचा वाढदिवस असून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक जुनी आठवण सांगितली आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का, त्या आमदारांना राष्ट्रवादीने नोटीस पाठवली, ४८ तासाचा दिला वेळ
२०१८ ला माझे वडील गेले, माझं पितृछत्र हरवलं. हा दिवस माझ्या जीवनातील अत्यंत वेदनादायी दिवस आहे. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे कुणी श्रीमंत लोकं सांत्वन भेटीला आले नव्हते. ज्यांच्या सोबत चळवळीत काम केलं त्यातील बडे पुढारी फिरकलेही नाही. अशा वेळी मला पहिला फोन हा धनंजय मुंडे यांचा आला असल्याचं मिटकरींनी म्हटलंय.
हेही वाचा…“ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत..!” आदित्य ठाकरेंनी डिवचलं
पुढे बोलतांना ते म्हणाले की, यावेळी मी राष्ट्रवादी पक्षात नव्हतो. इथुन राष्ट्रवादीत जुळलो. परळीला जाऊन मुंडे साहेबांची भेट घेतली. त्यांनी पुढचा मार्ग दाखवला व मी इथवर आलो. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात,माझे मार्गदर्शक, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
यावेळी मी राष्ट्रवादी पक्षात नव्हतो. इथुन राष्ट्रवादीत जुळलो.परळीला जाऊन मुंडे साहेबांची भेट घेतली. त्यांनी पुढचा मार्ग दाखवला व मी इथवर आलो. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात,माझे मार्गदर्शक, राज्याचे कृषीमंत्री श्री धनंजय मुंडे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐@dhananjay_munde https://t.co/Dv5soy8AuZ
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांनी किती घर फोडली, सरकारं अस्थिर केली, हाच डाव…”, भाजपची राष्ट्रवादीवर जहरी टिका
हेही वाचा…“अजित दादांना मोदींचं काम आवडलं अन्…”, एकनाथ शिंदेंची नाशकात टोलेबाजी
हेही वाचा…“लोकांच्या पोटदुखीवर डॉ.एकनाथ शिंदे, अन् अजित पवार”, नाशकातून फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…“इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचा, चेसी बारामती..”, रोहित पवारांनी डिवचलं
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री पद द्या, नाहीतर अर्थमंत्री पद, असा दिल्लीत होता प्रस्ताव “