मुंबई : राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात खातेवाटप करण्यात आले. यातच राष्ट्रवादच्या मंत्र्यांना भाजपकडची ६ तर शिंदे गटाकडची ३ मंत्रिपदं देण्यात आली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थखातं आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांना अर्थ खातं, शिंदे गटाच्या आमदारांना खाली माना घालून फिरावं लागणार
आदित्य ठाकरे यांनी ट्विटवर एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना खोचक टोला हाणला आहे. चला, अखेर मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १३ दिवसांनी खातेवाटप झालं. पहिले २० नंतर ९ असा विस्तार झाला. आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत..! त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजप ने ३३ देशांना दाखवून दिलंय असा टोलाही अदित्य ठाकरे यांनी लगावला.
हेही वाचा…दबक्या पावलांनी आले अन्..! शिंदेंचे मंत्री बघत राहिले अन् अजित दादांनी मैदान मारलं
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील सर्वात चर्चेत असलेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खातं काढून धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर शिवसेनेचे कायम वादग्रस्त नेते असलेले संजय राठोड यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खातं काढून ते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण खातं देण्यात आलं असून त्या पहिल्या मंत्री झाल्या आहेत.दरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडील क्रिडा व युवक कल्याण खातं काढून संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर रविंद्र चव्हाण यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं काढून छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर अतुल सावे यांच्याकडील सहकार खातं दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे.
चला, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर १३ दिवसांनी खाते वाटप झालं…
पहिले २०, नंतर ९ असा विस्तार झाला. आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का?
ना खाती, ना इज्जत!त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा ने ३३ देशांना…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांची येवल्यात सभा, शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर देणार, तारिख निश्चित ?
हेही वाचा…अजित पवार की शरद पवार ? अखेर नाशिकच्या ‘त्या’ आमदारानी जाहीर केली भूमिका
हेही वाचा…शिंदे सरकारमधील आमदारांमध्ये हमरीतुमरी, नितेश राणे-अमोल मिटकरी एकमेकांत भिडले
हेही वाचा…“शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर शिंदे गटाला येऊन थांबावं लागलं”, खातेवाटपावरून काॅंग्रेसने डिवचलं
हेही वाचा…अब्दुल सत्तार यांच्या हातून कृषीमंत्रीपद निसटलं, राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता बनला महाराष्ट्राचा नवा कृषीमंत्री