मुंबई : अजित पवार विकास निधी देत नाही म्हणून महाविकास आघाडी सरकारमधून शिंदे गटातील आमदार बाहेर पडल्याचं सांगितलं. परंतु आज अजित पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा अर्थखातं देण्यात आलं. अजित पवारांना अर्थखातं देण्यावर शिंदे गटातील आमदारांची नाराजी होती. तरीही देखील त्यांच्याकडे हा विभाग देण्यात आला. त्यावरून आता काॅंग्रेसेने त्यांच्यावर टिका केलीय.
हेही वाचा…वादग्रस्त मंत्र्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, शिंदें अन् भाजपच्या मंत्र्यांची ‘ही’ खाती काढली
अजित पवार आर्थिक नाकेबंदी करतात म्हणून महाराष्ट्राची हद्द ओलांडून सुरत मार्गे गुवाहाटी-गोवा करत राज्यात पोहोचलेल्या शिंदे गटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं. ही एकनाथ शिंंदे यांच्या राजकीय कारकीर्दीची शोकांतिका आहे. शिंदे यांचे राजकीय अस्तित्व फार दिवसाचं नाही. हेच आज सिद्ध झाले. हिवाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे नसतील हे आज स्पष्ट झालंय. अशी खोचक टिप्पणी माजी मंत्री आणि काॅंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलीय.
हेही वाचा…अखेर अजित पवारांकडे अर्थमंत्री पद, तर धनंजय मुंडेंकडे कृषी खातं, राष्ट्रवादीच्या नेत्यांना अखेर वाटप
दरम्यान, बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं. शिवसेना आणि भाजप मंत्र्यांची खाती राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना देण्यात आले. यामध्ये कृषी, सहकार, वैदकीय शिक्षण, क्रिडा, महिला व बालकल्याण, अन्न व नागरी पुरवठा ही महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली.
अजित पवार आर्थिक नाकेबंदी करतात म्हणून महाराष्ट्राची हद्द ओलांडून सुरत मार्गे गुवाहाटी-गोवा करत राज्यात पोहोचलेल्या शिंदेगटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं ही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीची शोकांतिका आहे. शिंदे यांचे राजकीय अस्तित्व फार दिवसाचं…
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 14, 2023
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ… pic.twitter.com/KwhXn15uO2
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अब्दुल सत्तार यांच्या हातून कृषीमंत्रीपद निसटलं, राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता बनला महाराष्ट्राचा नवा कृषीमंत्री
हेही वाचा…अजित पवारांना अर्थ खातं, शिंदे गटाच्या आमदारांना खाली माना घालून फिरावं लागणार
हेही वाचा…दबक्या पावलांनी आले अन्..! शिंदेंचे मंत्री बघत राहिले अन् अजित दादांनी मैदान मारलं
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती मिळाली, वाचा शिंदेंच्या मंत्रिमंडळातील संपुर्ण मंत्र्यांची यादी
हेही वाचा…अजित पवारांनी डाव साधला, शिंदेंच्या आमदारांची पंचाईत, शिंदे गटातील आमदार तोंडावर पडले