मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष सत्तेत गेल्यानंतर शिंदे गटातील आमदारांना आता खाली माना घालून फिरावं लागणार आहे. कारण त्यांची आता कुवत आणि पात्रताही राहिली नाही. एखाद्याला जर स्वाभिमान असता, मान सन्मान असता तर तात्काळ या ४० लोकांनी भाजपची साथ सोडली असती. पण ज्या दिवशी अजित पवारांचा सहभाग या सरकारमध्ये झाला. त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांची भाजपला गरज संपली आहे. असा जोरदार टोला ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी शिंदेंना लगावला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी राजभवनात पोहचली, अजित पवारांची प्रतिक्रिया
अजित पवार यांच्यावर आरोप करून जे आमदार बाहेर पडले होते. त्यात अजित पवारांना अर्थ खातं दिलं गेलं आहे. त्यामुळे आता शिंदे गटाच्या लोकांना माना खाली घालूनच फिरावं लागणार आहे. आता काय करावं आणि काय करू नये. अशी घालमेल आता शिंदे गटात दिसून येत आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाची निवडणुक आयोगात धाव, थेट अर्ज करत केली ‘ही’ मागणी
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार असतांना अजित पवार विकास निधी देत नसल्याचं कारण शिंदे गटातील आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांकडे अर्थखातं जाऊ नये म्हणून शिंदेंच्या आमदारांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. यादरम्यान शिंदेंसह काही आमदारांची हमरीतुमरी देखील झाल्याची माहिती होती. परंतु आज अखेर शिंदेंच्या आमदारांना नमतं घ्यावं लागलं आहे.
हेही वाचा…“तेव्हा काहीतरी शिजत होतं आणि त्याचा वास…”, बाळासाहेब थोरातांचं सुचक वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील सर्वात चर्चेत असलेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खातं काढून धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर शिवसेनेचे कायम वादग्रस्त नेते असलेले संजय राठोड यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खातं काढून ते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण खातं देण्यात आलं असून त्या पहिल्या मंत्री झाल्या आहेत.दरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडील क्रिडा व युवक कल्याण खातं काढून संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर रविंद्र चव्हाण यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं काढून छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर अतुल सावे यांच्याकडील सहकार खातं दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…दबक्या पावलांनी आले अन्..! शिंदेंचे मंत्री बघत राहिले अन् अजित दादांनी मैदान मारलं
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती मिळाली, वाचा शिंदेंच्या मंत्रिमंडळातील संपुर्ण मंत्र्यांची यादी
हेही वाचा…अजित पवारांनी डाव साधला, शिंदेंच्या आमदारांची पंचाईत, शिंदे गटातील आमदार तोंडावर पडले
हेही वाचा…वादग्रस्त मंत्र्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, शिंदें अन् भाजपच्या मंत्र्यांची ‘ही’ खाती काढली
हेही वाचा…अखेर अजित पवारांकडे अर्थमंत्री पद, तर धनंजय मुंडेंकडे कृषी खातं, राष्ट्रवादीच्या नेत्यांना अखेर वाटप