मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही नेत्यांमध्ये गुरूवारी सकाळी वर्षा बंगल्यावर जवळपास दीड तास बैठक झाली. यामध्ये खातेवाटपाविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. खातेवाटपात शिवसेना आणि भाजपच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल झालं आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे तोप डागणार, २२ जुलैला ठाण्यात ठाकरेंची सभा
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला जी माहिती मिळाली, त्यानुसार राज्यपालांकडे याबाबतची यादी गेली आहे. त्यात वेगवेगळ्या मंत्र्यांना कोणती यादी दिली आहेत हे जाहीर होईल. त्यानुसार मंत्री जबाबदारी घेतील आणि कामाला सुरूवात करतील. असंही अजित पवारांनी नमुद केलं आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांना देखील शरद पवारांचं पत्र, पत्राद्वारे व्यक्त केली खंत
यातच महाविकास आघाडी सरकार असतांना राष्ट्रवादीकडे वित्त आणि नियोजन, गृह खाते, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, राज्य उत्पादन शुल्क , सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, अन्न आणि नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, अल्पसंख्यांक कामगार ही खाती होती. त्यापैकी आता शिंदेंच्या सरकारमध्ये क्रिडा खातं मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
अर्थ – अजित पवार
कृषी – धनंजय मुंडे
सहकार- दिलीप वळसे पाटील
वैद्यकीय शिक्षण – हसन मुश्रीफ
अन्न नागरी पुरवठा – छगन भुजबळ
अन्न आणि औषध प्रशासन – धर्मराव अत्राम
मदत आणि पुनर्वसन – अनिल पाटील
क्रीडा- संजय बनसोडे
महिला बालकल्याण – अदिती तटकरे खाती
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी राजभवनात पोहचली, अजित पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…शाब्बास इंडिया…! चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ISRO च्या वैज्ञानिकांचं अभिनंदन; म्हणाले
हेही वाचा…शरद पवार गटाची निवडणुक आयोगात धाव, थेट अर्ज करत केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“तेव्हा काहीतरी शिजत होतं आणि त्याचा वास…”, बाळासाहेब थोरातांचं सुचक वक्तव्य
हेही वाचा…शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांना धोक्याची घंटा, कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस