मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही नेत्यांमध्ये गुरूवारी सकाळी वर्षा बंगल्यावर जवळपास दीड तास बैठक झाली. यामध्ये खातेवाटपाविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. खातेवाटपात शिवसेना आणि भाजपच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल झालं आहे. तर अनेक मंत्र्यांकडील खांत काढून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे देण्यात आलं आहे.
हेही वाचा…शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांना धोक्याची घंटा, कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेऊन त्यांना खातेवाटप करण्यात आलेली नव्हती. खातेवाटपात शिंदे गटातील आमदारांनी आक्षेप नोंदवल्याने खातेवाटप रखडले होते. यातच आज खातेवाटप करण्यात आले असून शिवसेना आणि भाजपच्या अनेक मंत्र्यांची खाती काढून राष्ट्रवादीच्या नेत्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये अजित पवार यांच्याकडेच अर्थखातं देण्यात आलं आहे.
हेही वाचा…शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे तोप डागणार, २२ जुलैला ठाण्यात ठाकरेंची सभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील सर्वात चर्चेत असलेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खातं काढून धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर शिवसेनेचे कायम वादग्रस्त नेते असलेले संजय राठोड यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खातं काढून ते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण खातं देण्यात आलं असून त्या पहिल्या मंत्री झाल्या आहेत.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांना देखील शरद पवारांचं पत्र, पत्राद्वारे व्यक्त केली खंत
दरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडील क्रिडा व युवक कल्याण खातं काढून संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर रविंद्र चव्हाण यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं काढून छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर अतुल सावे यांच्याकडील सहकार खातं दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची खातेवाटप यादी
अर्थ – अजित पवार
कृषी – धनंजय मुंडे
सहकार- दिलीप वळसे पाटील
वैद्यकीय शिक्षण – हसन मुश्रीफ
अन्न नागरी पुरवठा – छगन भुजबळ
अन्न आणि औषध प्रशासन – धर्मराव अत्राम
मदत आणि पुनर्वसन – अनिल पाटील
क्रीडा- संजय बनसोडे
महिला बालकल्याण – अदिती तटकरे खाती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
READ ALSO :
हेही वाचा…अखेर अजित पवारांकडे अर्थमंत्री पद, तर धनंजय मुंडेंकडे कृषी खातं, राष्ट्रवादीच्या नेत्यांना अखेर वाटप
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी राजभवनात पोहचली, अजित पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…शाब्बास इंडिया…! चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ISRO च्या वैज्ञानिकांचं अभिनंदन; म्हणाले
हेही वाचा…शरद पवार गटाची निवडणुक आयोगात धाव, थेट अर्ज करत केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“तेव्हा काहीतरी शिजत होतं आणि त्याचा वास…”, बाळासाहेब थोरातांचं सुचक वक्तव्य