मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांसह सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्याचा खातेवाटपाचा तिढा आता सुटला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं असून शिंदे आणि भाजपमधील काही मंत्र्यांचं खातं काढून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत.
हेही वाचा…शाब्बास इंडिया…! चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ISRO च्या वैज्ञानिकांचं अभिनंदन; म्हणाले
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेऊन त्यांना खातेवाटप करण्यात आलेली नव्हती. खातेवाटपात शिंदे गटातील आमदारांनी आक्षेप नोंदवल्याने खातेवाटप रखडले होते. यातच आज खातेवाटप करण्यात आले असून शिवसेना आणि भाजपच्या अनेक मंत्र्यांची खाती काढून राष्ट्रवादीच्या नेत्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये अजित पवार यांच्याकडेच अर्थखातं देण्यात आलं आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाची निवडणुक आयोगात धाव, थेट अर्ज करत केली ‘ही’ मागणी
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार असतांना अजित पवार विकास निधी देत नसल्याचं कारण शिंदे गटातील आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांकडे अर्थखातं जाऊ नये म्हणून शिंदेंच्या आमदारांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. यादरम्यान शिंदेंसह काही आमदारांची हमरीतुमरी देखील झाल्याची माहिती होती. परंतु आज अखेर शिंदेंच्या आमदारांना नमतं घ्यावं लागलं आहे.
हेही वाचा…“तेव्हा काहीतरी शिजत होतं आणि त्याचा वास…”, बाळासाहेब थोरातांचं सुचक वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील सर्वात चर्चेत असलेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खातं काढून धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर शिवसेनेचे कायम वादग्रस्त नेते असलेले संजय राठोड यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खातं काढून ते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण खातं देण्यात आलं असून त्या पहिल्या मंत्री झाल्या आहेत.दरम्यान, भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडील क्रिडा व युवक कल्याण खातं काढून संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर रविंद्र चव्हाण यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं काढून छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर अतुल सावे यांच्याकडील सहकार खातं दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे.
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ… pic.twitter.com/KwhXn15uO2
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 14, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती मिळाली, वाचा शिंदेंच्या मंत्रिमंडळातील संपुर्ण मंत्र्यांची यादी
हेही वाचा…अजित पवारांनी डाव साधला, शिंदेंच्या आमदारांची पंचाईत, शिंदे गटातील आमदार तोंडावर पडले
हेही वाचा…वादग्रस्त मंत्र्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, शिंदें अन् भाजपच्या मंत्र्यांची ‘ही’ खाती काढली
हेही वाचा…अखेर अजित पवारांकडे अर्थमंत्री पद, तर धनंजय मुंडेंकडे कृषी खातं, राष्ट्रवादीच्या नेत्यांना अखेर वाटप
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी राजभवनात पोहचली, अजित पवारांची प्रतिक्रिया