नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडानंतर येवल्यात पहिली सभा घेतली. यातच आता त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार येवल्यात सभा घेणार आहेत. आज नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…दबक्या पावलांनी आले अन्..! शिंदेंचे मंत्री बघत राहिले अन् अजित दादांनी मैदान मारलं
ज्या ज्याठिकाणी पवार साहेब सभा घेतील. त्याठिकाणी मला उत्तर सभा घ्यावा लागतील. असं अजित पवारांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं. यातच आता शरद पवारांची येवल्यात सभा झाली. त्यावर आता राज्यातील सर्व मंत्रिमंडळाचा विस्तार, अधिवेशन आणि इतर कामं आटोपली की त्यासंदर्भात निर्णय घेऊ. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी देखील त्यासंदर्भात चर्चा करू. अन् त्यासंदर्भात निर्णय घेऊ. असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती मिळाली, वाचा शिंदेंच्या मंत्रिमंडळातील संपुर्ण मंत्र्यांची यादी
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सहाच्या सहा आमदारांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार. त्यांनी टाकलेल्या पाठिंबा, विश्वास तसेच त्यांनी ठेवलेल्या अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देण्याचा आम्ही सगळेचजण प्रयत्न करू. असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार की शरद पवार ? अखेर नाशिकच्या ‘त्या’ आमदारानी जाहीर केली भूमिका
हेही वाचा…शिंदे सरकारमधील आमदारांमध्ये हमरीतुमरी, नितेश राणे-अमोल मिटकरी एकमेकांत भिडले
हेही वाचा…“शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर शिंदे गटाला येऊन थांबावं लागलं”, खातेवाटपावरून काॅंग्रेसने डिवचलं
हेही वाचा…अब्दुल सत्तार यांच्या हातून कृषीमंत्रीपद निसटलं, राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता बनला महाराष्ट्राचा नवा कृषीमंत्री
हेही वाचा…अजित पवारांना अर्थ खातं, शिंदे गटाच्या आमदारांना खाली माना घालून फिरावं लागणार