मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला. यातच दोन्ही गटाची ५ जुलै रोजी मुंबईत पक्षाची आढावा बैठक पार पडली. अजित पवार गटाच्या बैठकीत जवळपास ३२ आमदार उपस्थित होते. तर शरद पवार गटाकडे १९ आमदार उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला. यातच आता राष्ट्रवादीच्या बैठकीत अनुपस्थित राहल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांना कारणे दाखवा नोटीस शरद पवार गटाने पाठवल्या आहेत.
हेही वाचा…अब्दुल सत्तार यांच्या हातून कृषीमंत्रीपद निसटलं, राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता बनला महाराष्ट्राचा नवा कृषीमंत्री
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ५ जुलैला दोन्ही गटाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी शरद पवार गटात अनुपस्थित असलेल्या आमदारांना नोटीस पाठवली असून त्यांना ४८ तासाचा उत्तर देण्याचा अवधी देण्यात आला आहे. यामध्ये आमदार सुनील शेळके, दिलीप बनकर, नितीन पवार, दीपक चव्हाण, इंद्रनील नाईक, यशवत माने, शेखर निकम, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रकपुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील, माणिकराव कोकाटे यांना नोटीस पाठवली आहे.
हेही वाचा…अजित पवारांना अर्थ खातं, शिंदे गटाच्या आमदारांना खाली माना घालून फिरावं लागणार
दरम्यान, ज्या ज्याठिकाणी पवार साहेब सभा घेतील. त्याठिकाणी मला उत्तर सभा घ्यावा लागतील. असं अजित पवारांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं. यातच आता शरद पवारांची येवल्यात सभा झाली. त्यावर आता राज्यातील सर्व मंत्रिमंडळाचा विस्तार, अधिवेशन आणि इतर कामं आटोपली की त्यासंदर्भात निर्णय घेऊ. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी देखील त्यासंदर्भात चर्चा करू. अन् त्यासंदर्भात निर्णय घेऊ. असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत..!” आदित्य ठाकरेंनी डिवचलं
हेही वाचा…अजित पवारांची येवल्यात सभा, शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर देणार, तारिख निश्चित ?
हेही वाचा…अजित पवार की शरद पवार ? अखेर नाशिकच्या ‘त्या’ आमदारानी जाहीर केली भूमिका
हेही वाचा…शिंदे सरकारमधील आमदारांमध्ये हमरीतुमरी, नितेश राणे-अमोल मिटकरी एकमेकांत भिडले
हेही वाचा…“शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर शिंदे गटाला येऊन थांबावं लागलं”, खातेवाटपावरून काॅंग्रेसने डिवचलं