पुणे : राज्यात महाविकास आघाडी पाडून भाजप-शिंदे सरकार स्थापन झालं. शिवसेनेत फुट पाडून भाजपने सत्तेत आल्याचा आरोप त्यांनंतर विरोधकांकडून करण्यात आला. तर राज्यात आता डबल इंजिन सरकार आल्याचा उल्लेख सत्ताधारी वारंवार करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…शिंदे सरकारमधील आमदारांमध्ये हमरीतुमरी, नितेश राणे-अमोल मिटकरी एकमेकांत भिडले
रोहित पवारांनी लोणावळा घाटातील एका ट्रकचा फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की, लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपची आठवण झाली. स्वत:ही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना. खरंतर रेल्वे इंजिन रूळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर आणि मार्ग चुकला तर स्वत:च्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते. जसं राजकारणासाठी भाजपने चुकीचा मार्ग निवडलाय. आता आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का, हे मात्र तपासावं लागेल. अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केलीय.
हेही वाचा…“शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर शिंदे गटाला येऊन थांबावं लागलं”, खातेवाटपावरून काॅंग्रेसने डिवचलं
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. तर आता राज्यात ट्रिबल इंजीनचं सरकार आल्याचा उल्लेख सत्ताधारी करीत आहेत.
लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना… खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर… आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या… pic.twitter.com/itZ6Gq4jmy
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री पद द्या, नाहीतर अर्थमंत्री पद, असा दिल्लीत होता प्रस्ताव “
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का, त्या आमदारांना राष्ट्रवादीने नोटीस पाठवली, ४८ तासाचा दिला वेळ
हेही वाचा…“ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत..!” आदित्य ठाकरेंनी डिवचलं
हेही वाचा…अजित पवारांची येवल्यात सभा, शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर देणार, तारिख निश्चित ?
हेही वाचा…अजित पवार की शरद पवार ? अखेर नाशिकच्या ‘त्या’ आमदारानी जाहीर केली भूमिका