पुणे : राज्यात महाविकास आघाडी पाडून भाजप-शिंदे सरकार स्थापन झालं. शिवसेनेत फुट पाडून भाजपने सत्तेत आल्याचा आरोप त्यांनंतर विरोधकांकडून करण्यात आला. तर राज्यात आता डबल इंजिन सरकार आल्याचा उल्लेख सत्ताधारी वारंवार करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर टिकास्त्र सोडलं आहे. त्यावर आता भाजपकडून प्रत्युत्त देण्यात आलं आहे.
हेही वाचा…“ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत..!” आदित्य ठाकरेंनी डिवचलं
रोहित पवारांनी लोणावळा घाटातील एका ट्रकचा फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की, लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपची आठवण झाली. स्वत:ही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना. खरंतर रेल्वे इंजिन रूळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर आणि मार्ग चुकला तर स्वत:च्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते. जसं राजकारणासाठी भाजपने चुकीचा मार्ग निवडलाय. आता आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का, हे मात्र तपासावं लागेल. अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केलीय.
हेही वाचा…अजित पवारांची येवल्यात सभा, शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर देणार, तारिख निश्चित ?
दरम्यान, खरंतर नीट सुरू असलेल्या ठिकाणी अस्थिरता निर्माण करणे, अडथळे आणणे, हे शरद पवारांचे वैशिष्ट. थोडा त्यांचा राजकीय इतिहास जो पाहिला त्याला कळेल. किती घर फोडली, सरकार अस्थिर केली. आज हाच डाव अख्खा उलटला म्हणून हतबलतेची भाषा? पक्षाची झालेली वाताहत स्पष्ट दिसते आहे. पण काय बोलणार ? कोणाला बोलणार? दोष कोणाला देणार? म्हणून अवाढव्य रेल्वे इंजिन, ट्रकची चेसी वगैरे वगैरे आणि शेवटी फिरून दोषी कोण तर भाजप असं म्हणत भाजप नेते केशव उपाध्यय यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय.
खरतर नीट सुरू असलेल्या ठिकाणी अस्थिरता निर्माण करणे, अडथळे आणणे, हे शरद पवारांचे वैशिष्टय. थोडा त्यांचा राजकीय ईतिहास जो पाहिल त्याला कळेल. किती घर फोडली, सरकार अस्थिर केली. आज हाच डाव अख्खा उलटला म्हणून हतबलतेची भाषा?
पक्षाची झालेली वाताहत स्पष्ट दिसते आहे पण काय बोलणार?… https://t.co/e4VzGPShrV— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजित दादांना मोदींचं काम आवडलं अन्…”, एकनाथ शिंदेंची नाशकात टोलेबाजी
हेही वाचा…“लोकांच्या पोटदुखीवर डॉ.एकनाथ शिंदे, अन् अजित पवार”, नाशकातून फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…“इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचा, चेसी बारामती..”, रोहित पवारांनी डिवचलं
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री पद द्या, नाहीतर अर्थमंत्री पद, असा दिल्लीत होता प्रस्ताव “
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का, त्या आमदारांना राष्ट्रवादीने नोटीस पाठवली, ४८ तासाचा दिला वेळ