मुंबई : राज्याचे माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती सुरू असून त्यापैकी एक कंपनी पेटीयम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारत रत्न सचिन तेंडुलकर करीत असल्याचं सांगत ही जाहिरात बंद करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
हेही वाचा…“अजितदादांना मुख्यमंत्री पद द्या, नाहीतर अर्थमंत्री पद, असा दिल्लीत होता प्रस्ताव “
एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात बच्चू कडू यांनी असं म्हटलंय की, सचिन तेंडुलकर हे प्रसिध्द क्रिकेटर असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळे ते करित असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान थोर सर्व स्तरापर्यंत होतो व या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून त्यांचे कौटुंबिक आयुष्य उद्वस्त देखील होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत.
हेही वाचा…अजित पवार गटाला मोठा धक्का, त्या आमदारांना राष्ट्रवादीने नोटीस पाठवली, ४८ तासाचा दिला वेळ
त्यात प्रामुख्याने श्री. प्रितेश विलास पवार रा. नालासोपारा ता. वसई यांनी माझ्याकडे प्रत्यक्ष तक्रार केलेली असून त्यांनी यासाठी आझाद मैदानात आंदोलनही केलेले आहे.पेटीयम फर्स्ट गेम या ऑनलाईन जुगारावर भारतातील आंध्रप्रदेश, आसाम, नागालँड, सिक्कीम, अरुणाचलप्रदेश, मेघालय, ओडीसा, तेलंगणा या आठ राज्यांमध्ये पूर्णतः बंदी घातली आहे. भारतरत्न सन्मानाने सन्मानीत झालेल्या व्यक्तीने अशा प्रकाराच्या जुगाराची जाहिरात करणे लोकांच्या हिताचे नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकर हे भारतरत्न सन्मानित असल्याने त्यांनी भारतातील जनतेचा विचार करून अशा प्रकारच्या जाहिराती करू नये ही आपल्या देशासाठी त्यांची नैतिक जबाबदारी आहे..
हेही वाचा…“ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती, ना इज्जत..!” आदित्य ठाकरेंनी डिवचलं
तरी महाराष्ट्रातील नव्हेच तर भारताची पुढील पिढी या जुगाराच्या विळख्यातून वाचवायची असेल तर या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी आणि लोकांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक फसवणूक थांबविण्यात यावी. असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“.. त्यावेळी कोणत्याही नेत्यांचे फोन आले नाहीत पण..,” मिटकरींनी धनंजय मुंडेंची सांगितली जुनी आठवण
हेही वाचा…“शरद पवारांनी किती घर फोडली, सरकारं अस्थिर केली, हाच डाव…”, भाजपची राष्ट्रवादीवर जहरी टिका
हेही वाचा…“अजित दादांना मोदींचं काम आवडलं अन्…”, एकनाथ शिंदेंची नाशकात टोलेबाजी
हेही वाचा…“लोकांच्या पोटदुखीवर डॉ.एकनाथ शिंदे, अन् अजित पवार”, नाशकातून फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…“इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचा, चेसी बारामती..”, रोहित पवारांनी डिवचलं