पुणे : महाराष्ट्रातील सोशल मीडियावर पुरोगामी विचार पसरवणाऱ्या तरूण वर्गाला संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच राजसत्तेनेही राजकीय विरोधकांविरोधातील विचारांची लढाई ही समोरासमोर आणि विचारांनीच लढावी असं आव्हान देखील रोहित पवारांनी दिलं आहे.
हेही वाचा…“अजित दादांना मोदींचं काम आवडलं अन्…”, एकनाथ शिंदेंची नाशकात टोलेबाजी
रोहित पवार यांनी केलेल्या ट्विट मध्ये असं म्हटलं आहे की, सोशल मीडियावर पुरोगामी विचारांचा एक मोठा तरुण वर्ग आहे. महाराष्ट्राचा हा पुरोगामी विचार टिकावा म्हणून या विचारसरणीच्या नेत्यांना या युवा वर्गाकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठं समर्थन मिळतंय. अर्थात काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मा. पवार साहेब हे पुरोगामी विचारांचे पाईक असल्याने त्यांना या युवा वर्गाचा मोठा पाठींबा आहे आणि त्यादृष्टीने आपल्या लिखाणातून ते सोशल मिडियात वेळोवेळी व्यक्त होत असतात. मात्र या युवा वर्गाला एका राजकीय आश्रय असलेल्या टोळीकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. या टोळीमध्ये प्रामुख्याने एकतर महिला आहेत किंवा महिलांच्या नावाने काढलेली अकाऊंट आहेत. या टोळीकडून सोशल मिडियातील या युवांच्या अकाऊंटवर अत्यंत गलिच्छ भाषेत कमेंट करुन या युवांनी त्यांच्याविरोधात चुकीची भाषा वापरावी, अशा पद्धतीने उद्युक्त केलं जातं आणि त्यांना प्रत्युत्तर दिल्यास महिला असल्याचा गैरफायदा घेत लगेच पोलिसांत तक्रार केली जाते.
हेही वाचा…“लोकांच्या पोटदुखीवर डॉ.एकनाथ शिंदे, अन् अजित पवार”, नाशकातून फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
एरवी महिलांवर अत्याचार होत असताना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्यास दिरंगाई करणाऱ्या सरकारच्या दबावाखालील पोलिस यंत्रणेकडूनही या युवांना तत्परतेने अटक केली जाते. याशिवाय पुरोगामी विचारधारेला मानणाऱ्या सोशल मिडियातील या व्यक्ती, मुलं, मुली जिथं कुठं काम करत असतील त्या कंपन्यांनाही फोन करुन किंवा ई-मेल करुन यांना कामावरुन काढून टाकण्यासाठी दबाव आणला जातो. हा अत्यंत हीन, संतापजनक आणि लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्याच्या मुळावर घाव घालणारा प्रकार आहे. एखाद्याची भूमिका पटत नसेल तर थेट त्याच्या नोकरीवर किंवा त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू पाहाणाऱ्या या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी या मुलांच्या बाजूने आम्ही सर्वजण खंबीरपणे उभं आहोत. सर्वसामान्य कुटुंबातील या मुलांचं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आम्ही कुणालाही हिरावू देणार नाही. यासाठी वाटेल ती किंमत मोजू पण राजसत्तेच्या राजाश्रयाआड लपून पुरोगामीत्वावर होणारे हे हल्ले आम्ही खपवून घेणार नाहीत. राजसत्तेनेही राजकीय विरोधकांविरोधातील विचारांची लढाई ही समोरासमोर आणि विचारांनीच लढावी… महिलांना पुढं करुन किंवा महिलांच्या नावाने अकाऊंट काढून त्यांच्या पदराआडून हल्ले करणं हे कोणत्याही राजसत्तेला शोभणारं नाही…
सोशल मीडियावर पुरोगामी विचारांचा एक मोठा तरुण वर्ग आहे. महाराष्ट्राचा हा पुरोगामी विचार टिकावा म्हणून या विचारसरणीच्या नेत्यांना या युवा वर्गाकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठं समर्थन मिळतंय. अर्थात काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मा. पवार साहेब हे पुरोगामी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात लवकरच काॅंग्रेसचं स्थिर सरकार येईल,” ‘या’ महिला आमदारानी व्यक्त केला विश्वास
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंना फोन केला अन्, सिल्वर ओकवर.. “,अजित पवारांनी सांगितली इनसाईट स्टोरी
हेही वाचा…“सचिन तेंडुलकर करत असलेल्या ‘त्या’ जाहिरातीवर बंदी आणा,” बच्चू कडूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हेही वाचा…“.. त्यावेळी कोणत्याही नेत्यांचे फोन आले नाहीत पण..,” मिटकरींनी धनंजय मुंडेंची सांगितली जुनी आठवण
हेही वाचा…“शरद पवारांनी किती घर फोडली, सरकारं अस्थिर केली, हाच डाव…”, भाजपची राष्ट्रवादीवर जहरी टिका