मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचं सरकार स्थापन झालं. यातच आता राष्ट्रवादीकडील काही नेत्यांचा गट सरकारमध्ये सामील झाल्याने विरोधी पक्षनेते पद आता रिक्त झालं आहे. यातच आता सर्वात जास्त संख्याबळ काॅंग्रेसकडे असल्याने त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद जाण्याची शक्यता आहे. यावर आता काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“लोकांच्या पोटदुखीवर डॉ.एकनाथ शिंदे, अन् अजित पवार”, नाशकातून फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
काॅंग्रेस पक्षाला राज्यातील विरोधी पक्षनेते पद मिळणार हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही हेट ऑन करणं ही आमची स्टॅंटेजी आहे. या अधिवेशनात अटॅक मोडमध्ये आम्ही दिसून येऊ. असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला अस्थिर सरकार देण्यात यशस्वी ठरलेत. हे सरकार जनमताचं सरकार नाही. लोकांमधून निवडून आलेले नेते नाहीत. ५० खोके आणि ईडीची भीती दाखवून आणलेलं सरकार असून जुळवाजुळवी करून भीती दाखवून सरकार करण्याचा हा प्रकार अतिशय लाजिरवाणा आहे. असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचा, चेसी बारामती..”, रोहित पवारांनी डिवचलं
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, ज्या दिवशी ग्राफ त्यांच्या बाजूने येईल त्या दिवशी निवडणुका होतील. स्वत:चं जनमत वाढवण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी हे एकमेकांचा वापर करून घेत आहेत. मात्र असं असलं तरीही सर्वे त्यांच्या बाजूने येत नाही. अजूनही कल त्यांच्या बाजूने नाही म्हणून निवडणुकांची घोषणा होत नाही. लोक आता निवडणुकांची वाट पाहत आहेत. लोकांना विश्वास आहे की काॅंग्रेसचे स्थिर सरकार देईल. त्यामुळे लवकरच पुन्हा एकदा काॅंग्रेसचं सरकार सत्तेत येईल. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंना फोन केला अन्, सिल्वर ओकवर.. “,अजित पवारांनी सांगितली इनसाईट स्टोरी
हेही वाचा…“सचिन तेंडुलकर करत असलेल्या ‘त्या’ जाहिरातीवर बंदी आणा,” बच्चू कडूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हेही वाचा…“.. त्यावेळी कोणत्याही नेत्यांचे फोन आले नाहीत पण..,” मिटकरींनी धनंजय मुंडेंची सांगितली जुनी आठवण
हेही वाचा…“शरद पवारांनी किती घर फोडली, सरकारं अस्थिर केली, हाच डाव…”, भाजपची राष्ट्रवादीवर जहरी टिका
हेही वाचा…“अजित दादांना मोदींचं काम आवडलं अन्…”, एकनाथ शिंदेंची नाशकात टोलेबाजी