नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष आपआपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एनडीएची नवी दिल्लीत मंगळवारी बैठक होत असून, जवळपास ३० पक्ष या आघाडीत सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, तर बंगळुरूत सोमवारी आणि मंगळवारी २४ विरोधी पक्ष बैठकीसाठी एकत्र येणार आहेत.
हेही वाचा…आगामी निवडणुकांसाठी ‘शरद पवारांचा’ मेगा प्लॅन, ‘या’ नेत्यांकडे दिल्या मोठ मोठ्या जबाबदाऱ्या
एनडीएची बैठक भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सहकारी पक्षांशिवाय भाजपने नवीन मित्रपक्षांना आणि माजी सहकाऱ्यांनाही आमंत्रित केले आहे. दिल्लीत अशोक हॉटेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी ही बैठक होणार आहे. बिहारमधील चार प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जीतन राम मांझी, राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र सिंह कुशवाह आणि विकासशील इंसान पक्षाचे मुकेश सहानी यांचा त्यात समावेश आहे.
हेही वाचा…“अजित दादा आता हिंदू सकल मोर्चात पण दिसतील”, भाजप आमदाराचा बडा दावा
दरम्यान, राज्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देखील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांना देखील एनडीएच्या बैठकीसाठी निमंत्रिण देण्यात आलं आहे. तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला देखील जे.पी.नड्डा यांनी निमंत्रण पाठवलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांना निलंबित करा,” ठाकरे गटाच्या नेत्यांची मोठी मागणी
हेही वाचा…अजित पवाराचं बंड, शिंदे सरकारचं पावसाळी अधिवेशन, कोणी गाजवलं आजचा दिवस ?
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ, लवकरच होणार घोषणा
हेही वाचा…“शरद पवार आपली नातीगोती विसरून आमदारांच्या निलंबणाचा निर्णय घेतील”
हेही वाचा…“अजित दादा दबंग नेता वगैरे काही नाही,” एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर जोरदार टोलेबाजी