मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मन वळवण्यासाठी दुसऱ्यांदा त्यांची भेट घेतली आहे. अजित पवार हे सोमवारी दुपारी त्यांच्या गटाच्या ३० आमदारांना घेऊन यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरुवातीला शरद पवार, अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात जवळपास पाऊणतास बैठक झाली.
हेही वाचा…माढ्यात भाजपला डोकेदुखी, मोहिते पाटील विरुद्ध खासदार निंबाळकर वाद पेटणार? नेमकं काय घडलं?
यानंतर अजित पवार यांनी आपल्यासोबत आलेल्या आमदारांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती शरद पवार यांना केली. शरद पवार यांनी शांतचित्ताने या सर्व आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, त्यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. या भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बैठकीत नेमके काय घडले, याचा तपशील सांगितला.
हेही वाचा…मुंबई महापालिकेत २६३ कोटींचा भ्रष्टाचार, आदित्य ठाकरेंचा आरोप, चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
आज अजित पवार, विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आम्ही सर्वजण शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला आलो होतो. जसं तुम्हाला माहिती आहे, काल दादांच्या नेतृत्वाखाली मंत्री आले होते. म्हणून आम्ही इथे आलो. त्यांना भेटून आम्ही सर्वांनी आशीर्वाद घेतला. काल केली तशीच आजही पक्ष एकसंध राहण्याबाबत विनंती केली. त्यानंतर आता आम्ही परत जात आहोत. शरद पवार यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यांच्या मनात आता काय आहे?, हे मी सांगू शकत नाही.
READ ALSO :
हेही वाचा…डझनभर विरोधी पक्षातील नेते राजभवनावर पोहचले, राज्यपालांकडे केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…अजित पवार गटाची शरद पवारांसोबत ४५ मिनिटं चर्चा, बैठकीत काय झालं ? अजित पवार गटांनी दिली माहिती
हेही वाचा…राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकवटले…! शरद पवारांच्या भेटीला, मोठा राजकीय भुकंप होणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादीत काही तरी शिजतयं, अजित पवारांसह सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला
हेही वाचा…मोठी बातमी..! निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, विप्लव बजोरी यांना अपात्र करा, ठाकरे गटाचं विधीमंडळ सचिवांना पत्र