मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३० आमदारांनी आज राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची यशवंत चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. अजित पवार गट आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४५ मिनिटे चर्चा झाली. तर काल प्रमाणेच आमचं म्हणणं सांगण्यासाठी तसेच शरद पवार यांचं आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. तसेच शरद पवार यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आहे, त्याचबरोबर त्यांच्या मनातलं आम्ही कसं काय सांगू शकतो ? असं देखील पटेल यांनी सांगितलं आहे. त्यावर एका वाक्यात शरद पवारांनी विषय संपवला.
हेही वाचा…डझनभर विरोधी पक्षातील नेते राजभवनावर पोहचले, राज्यपालांकडे केली ‘ही’ मागणी
राज्याच्या विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाच्या पहिला दिवस संपल्यानंतर सर्वच आमदारांना अजित पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले. त्यानंतर शरद पवार गटातील आमदार त्याठिकाणी दाखल झालेत. शरद पवार आल्यानंतर बैठकीला सुरूवात झाली. या बैठकीत अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांनी आमदारांची भाजपसोबत जाण्याची भावना असल्याचं शरद पवारांना सांगितलं. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, आयुष्यभर मी यांच्या विरोधात लढलो आणि आता यांच्यासोबत कसं जाऊ? असं म्हणत प्रत्यक्षपणे आपला निर्णय शरद पवारांनी जाहीर करून टाकला.
हेही वाचा…अजित पवार गटाची शरद पवारांसोबत ४५ मिनिटं चर्चा, बैठकीत काय झालं ? अजित पवार गटांनी दिली माहिती
दरम्यान, शरद पवारांच्या भूमिकेवर शंका घेण्याचं कोणतंही कारण नाही. याआधीच येवल्याच्या सभेत शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर करून टाकली आहे. तसेच भेटीला येणाऱ्या सर्वच आमदारांना शरद पवार वेळ देत असतात. राष्ट्रवादी पक्ष हा विरोधात असून तो विरोधात असणार आहे. असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…*“बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा आणणार,” कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा*
हेही वाचा…अजित पवार विरूद्ध शरद पवार, व्हीप कुणाचा मानायचा? राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रश्न
हेही वाचा…“..तर दादांच्या गटाला दारातूनच गेटलॉस्ट केलं असतं”, संजय राऊतांनी अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…उपसभापतींना अपात्र करा, विरोधकांच्या मागणीनंतर आता निलम गोऱ्हे म्हणाल्या की, “मी चर्चेला वेळ…”,
हेही वाचा…“शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, अन्…”, शरद पवारांच्या भेटीनंतर पटेलांनी दिली मोठी प्रतिक्रिया