बारामती : महायुतीच्या उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची घोषणा झाल्यानंतर बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. काल सुप्रिया सुळे यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलीय. त्यामुळे बारामतीत पवार विरूद्ध पवार अशी लढत निश्चित झालीय. यातच आता पवार साहेबांच्या पराभवासाठी टपून बसलेल्या भाजपच्या या खेळीला बळी न पडता बारामतीकर सुप्रियाताईंना ३ लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून देऊन भाजपचे दात त्यांच्याच घशात घालून चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. त्याला आता भाजपकडून जोरादार प्रत्युत्तर देण्यात आलंय.
हेही वाचा…शरद पवार गटाचे पाच उमेदवार जाहीर ; लंके, सुप्रिया सुळे कोल्हेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर
बारामतीत पवार विरूद्ध पवार अशी पहिल्यांदाच लढत असल्याने महाराष्ट्रातील यंदाची ही सर्वात लक्षवेधक लढत ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर महायुती विरूद्ध महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील बघायला मिळत आहेत. यातच भाजप युवा मोर्चाचे पुणे ग्रामीण महामंत्री वैभव सोलनकर यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय नेते झाल्याचं भासवत आहेत. त्यातूनच ते बारामतीत सुनेत्राताई पवार यांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहेत. रोहित पवार यांना आमदार करण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा १०० टक्के वाटा आहे.. त्यामुळे रोहित पवारांनी स्वत:ची आमदारकी सांभाळावी असा उपरोधिक टोला भाजप युवा मोर्चाचे पुणे ग्रामीण महामंत्री वैभव सोलनकर यांनी लगावला आहे..
अजितदादांनी ताकद दिल्यामुळे रोहित पवार यांना आमदारकी मिळाली. मात्र मतदारसंघातील जनतेची कामे करण्यापेक्षा राज्यभर मिरवण्यात वेळ घालवल्यामुळे कर्जत जामखेडच्या जनतेने रोहित पवारांचं पार्सल पुन्हा बारामतीला पाठवण्याचा चंग बांधला आहे असंही सोलनकर यांनी म्हटलं आहे..
हेही वाचा…पवारांच्या शिष्टाईनंतर मोहिते-पाटील अन् आढळराव यांच्यात दिलजमाई ; कोल्हेंपुढे मोठी अडचण
दरम्यान, गेल्या काही वर्षापासून बारामती जिंकण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केलेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना कधी यश आले नाहीत. यावेळी बारामतीचा उमेदवार पवार कुटुंबियातीलच आहे. मागच्या वेळी मावळात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार निवडणुकीच्या मैदानात उभे होते. यावेळी बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुळेंच्या विरोधात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील यंदाची सर्वात लक्षवेधक लढत बारामतीत होणार आहे. त्यामुळे बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न यावेळी अजित पवार पुर्ण करणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बारामतीतून सुप्रियाताई लढणार हे आधीच निश्चित होतं, त्यामुळं पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे त्यांच्यासोबत गेलेले आपले लोक कदाचित यशस्वी होऊ देणार नाहीत, असं वाटत होतं. दुर्दैवाने आज भाजपची चाल यशस्वी ठरली असली तरी बारामतीची जनता स्वाभिमानी आहे. आदरणीय पवार साहेबांच्या पराभवासाठी टपून बसलेल्या भाजपच्या या खेळीला बळी न पडता बारामतीकर सुप्रियाताईंना ३ लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून देऊन भाजपचे दात त्यांच्याच घशात घालून चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आहे. असे रोहित पवार यांनी म्हटले होते.
READ ALSO :
हेही वाचा…“कामगारांचा मुलगा अन् विरोधात माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी”, लढाई जिंकणार कशी ? राम सातपुते यांनी सांगितली रणनिती
हेही वाचा…“बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न यावेळी अजित पवार पुर्ण करणार का ?” महाराष्ट्रातील यंदाची सर्वात लक्षवेधक लढत
हेही वाचा…शिंदे कुटुंबीयांना आम्ही वैतागलोय, सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या विरोधात मोठा रोष
हेही वाचा…मोहोळांना विजयी करण्यासाठी सर्व आघाड्या लागल्या कामाला ; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या मॅरेथॉन बैठका सुरू
हेही वाचा…“मोदींचे हात बळकट करण्यासाठी ऊस तोडणी कामगारांचा मुलगा लोकसभेत पाठवा ; समाधान दादा आवताडे यांचं जनतेला आवाहन