मुंबई : काय ती झाडी, काय तो डोंगार, काय ती हाटील असा डॉयलाग मारून रातोरात प्रसिद्धीच्या झळोक्यात आलेल्या आमदाराला पुन्हा एकदा डॉयलाग मारावा लागणार आहे. कारण मुंबईतील आमदार निवास स्थान असलेल्या बंडखोर आमदार शहाजी बापू यांच्या खोलीचं छत कोसळलं आहे. त्यामुळे काय तो छत, काय तो पावसाळा, काय तो आमदार निवास, आता कसं इथं राहायचं, असा प्रश्न देखील त्यांना पडला असावा.
शिवसेनेचे अपमानीत ‘योद्धे’ घायाळ; सामान्य शिवसैनिकांसह नेत्यांमध्ये कमालीची नाराजी
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शहाजी बापू पाटील देखील गुवाहाटी येथे होते. त्यावेळी त्यांचं कार्यकत्यांसोबत झालेला संवाद चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावर राजकीय नेत्यांनी देखील प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बंडखोर आमदार आपापल्या मतदार संघात परतले आहेत. अशातच आज बंडखोर आमदार शहाजी बापू यांचं मुंबईतील आमदार निवास स्थान असलेलं आकाशवाणी येथील रूम नंबर 312 मधील रूमचं छत कोसळलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दालनात फुलांची सजावट; सत्यनारायणाच्या पुजेनं होणार नव्या सरकारची सुरूवात
मुंबईत सध्या गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहाजी बापू यांच्या रूमचं छत काल संध्याकाळी कोसळलं. त्यानंतर लगेच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी भेट दिली. तर ती रूमचं दुरूस्तीसाठी बंद करण्यात आली. त्यामुळे आता सोशल मीडियावर देखील या गोष्टीची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, शहाजी बापू गुवाहाटीमध्ये असताना शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांचं पोस्टर जाळले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांचं आपापल्या मतदार संघात जोरदार स्वागत केलं आहे.
Read also
- “मी कधीच कुणासमोर लोटागंण घालत नाही”; बंडखोर आमदाराचं राऊतांना प्रत्युत्तर
- “चमत्कार बाबा संजय राऊतांमुळेच ठाण्यात एकच नगरसेवक शिल्लक राहिला”
- “भाजप अन् शिवसेनेमध्ये आता लव्ह मॅरेज झालंय”; दिपक केसरकरांंचं वक्तव्य
- भास्करराव जाधवनंतर आता नितेश राणेंही शेतात राबतोय; राणेंनी बांधावरच केली न्याहारी
- उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरचा झटका..! ठाण्यातील तब्बल ६६ नगरसेवक फुटले