गडचिरोली : महामारीच्या दुसऱ्या लाटेचा राज्याला मोठा फटका बसला असून, राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये सातत्याने बदल करून सध्या राज्यात १५ मे पर्यंत कडक निर्बध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही राज्यात रुग्णसंख्या वाढीचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. परिणामी, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अचानक गडचिरोली जिल्हयाचा दौरा केला. यावेळी पोलीस आणि आरोग्य प्रशासन यंत्रणेची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करुन, कोविड सेंटरलाही भेट देऊन, रुग्णांशी संवाद साधला, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन त्यांनी जिल्ह्यातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी, बैठकीनंतर बोलताना, त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे काही मंत्र्यावर टीका केली. “राज्याच्या काही वजनदार मंत्र्यानी, ते केवळ एका जिल्ह्याचे किवा तालुक्याचे मंत्री नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे असे सांगत, अशाप्रकारच्या सुविधांची अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्याला गरज आहे, याचा विचार मंत्र्यांनी करावा, अशी खोचक टीका केली.
तसेच, यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले आणि लसीकरण मोहीमेवर भर देण्याची सुचना केली. तसेच, भाजपच्या खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांनी अतिदुर्गम भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळावा म्हणून, दौरे करुन जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सुचना देखील त्यांनी केली.
Read Also
- पुण्यात उभारलं जाणार देशातलं पहिलं ‘चाईल्ड कोविड सेंटर; महापालिकेचा निर्णय
- “…तर ते माझ्या जीवाचं बरं-वाईट करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत”, अँटिलीया जिलेटीन स्फोटकं प्रकरणाला नवे वळण
- ‘एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यावी’
- ‘मुझे तो माँ गंगा ने बुलाया हैं’ म्हणत बनारसमधील नागरिकाच्या भावनांशी खेळणारे पंतप्रधान आज…
- धंदेबाज लोकांनी स्वतःचे धंदे बघावे, आमचं आम्ही बघू; मलिकांचा काकडेंवर निशाणा