मुंबई : राष्ट्रवादीच्या पक्षफुटीबाबत केलेल्या वक्तव्यावरून काल संपुर्ण राजकारण शरद पवार यांच्या भोवती फिरत आहेत. अजित पवार आमचेच नेते आहेत. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्याला फुट म्हणत नाही. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. याच गोष्टीला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दुजोरा दिल्याने राज्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“भारतीय कुस्ती खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत,” UWW ची मोठी कारवाई, अमोल कोल्हे संतापले
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. परंतु राष्ट्रवादीचा शरद पवार गट अद्यापही विरोधात आहे. मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेटीगाठी होत असल्याने एक गट सत्तेत तर दुसरा गट विरोधात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. यातच सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी पक्षात कोणतीही फुट न झाल्याचं म्हटल्यानंतर आता राज्यात चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी मैदान मारलं, पण अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्यु्त्तर”, वाचा सविस्तर
दरम्यान, आज शरद पवार यांची कोल्हापुरात सभा होत आहे. तर दुसऱ्या बाजूला आज तब्बल अडीच महिन्यानंतर अजित पवार पिंपरी चिंचवड मध्ये आले आहे. अजित पवार यांचं पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार सध्या सातारा दौऱ्यावर असून त्याठिकाणी त्यांचंही स्वागत करण्यात येतंय.
READ ALSO :
हेही वाचा…“पक्ष फोडण्याचे आमच्यात संस्कार नाहीत,” चंद्रशेखर बावनकुळेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
हेही वाचा…डिनरमध्ये झुणका भाकर, वडापाव, अन् तुतारी, नाशिक ढोलच्या गजरात इंडियाच्या नेत्यांचं मुंबईत जंगी स्वागत होणार
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांचं मरण होतंय,” वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचं नाफेडच्या अधिकाऱ्यांना पत्र, कांदा प्रश्नी केली ‘ही’ मागणी