पणजी : गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निणर्य राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांनी घेतला आहे. या ठिकाणी भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली असल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारल्याबाबत आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. 5 वर्षानंतर पर्रीकरांना पुन्हा पणजीमध्ये आणू. मात्र, पर्रीकरांना पणजी हवी असल्यास ते शक्य नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
गोळ्या खायची वेळ आली तर पहिले मी खाईल; रेल्वेच्या नोटिसीवरून खासदार श्रीकांत शिंदे आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपमधील दिवंगत जेष्ठ नेते मनोहर पर्रीकर हे संघटक प्रेमी होते. पर्रिकर कुटुंब हे आमचं कुटुंब आहे. उत्पल पर्रीकर यांच्याशी आम्ही चर्चा करुन त्यांची नाराजी दूर करू. आम्ही त्यांची स्वतः भेट घेऊन नाराजी दूर करणार आहोत. पर्रिकर कुटुंब हे आमचं कुटुंब आहे.
भाजपपाठोपाठ शिवसेनेचीही गोव्यासाठी यादी जाहीर; प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरणार
तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत सांगायचे झाले तर हे हिंदूविरोधी आहे. याचे उदाहरण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत हे समोर आले आहे. कुणाचे कुणासोबत साटलोटे आहे हे आमच्यासह सर्वांना माहित आहे. उत्पल पर्रीकरांच्या बाबतीत शिवसेनेकडून दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
Read also:
- अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; नाना पटोले आक्रमक
- कोल्हेंच्या नथूराम गोडसेंवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच मतं काय? जयंत पाटील म्हणतात…
- अमोल कोल्हेंचा नथुराम गोडसे वादात; भाजपकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- नथुराम गोडसेंची भूमिका: शरद पवारांकडून खासदार अमोल कोल्हेंच समर्थन… म्हणाले…
- अमोल कोल्हेंच्या भूमिकेतून नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण होऊ नये – बाळासाहेब थोरात