मुंबई : ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी दावा केला की त्यांना एका व्यक्तीकडून धमकीचा फोन आला, त्या व्यक्तीने त्यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना टार्गेट करण्याविरुद्ध धमकावले आहे. नवाब मलिक म्हणाले की, धमकीच्या कॉल आल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा कॉल राजस्थानातून करण्यात आला होता, असा दावा मलिकांनी केला.
आम्हाला देवळाची घंटा वाजविण्याची सवय, आज नाट्यगृहातील घंटा पहिल्यांदा वाजवली – अजित पवार
समीर वानखेडे हे चांगले काम करत आहेत त्यांच्या कामात अडथळा आणू नका आणि टार्गेट करु नका असंही धमकावणाऱ्याने म्हटल्यांचं बोललं जात आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. बॉलिवूडमधून समोर आलेलं ड्रग्ज कनेक्शन तसेच मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर नवाब मलिक एनसीबीवर सातत्याने आरोप करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप करत आहेत. तसेच एनसीबीचे झोनल चीफ समीनर वानखेडे आणि त्याच्या परिवारावर सुद्धा नवाब मलिक आरोप करत आहेत.
संजय राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नसेल; चित्रा वाघ भडकल्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडेंचे दुबईतील हॉटेलमधील फोटो काल (21 ऑक्टोबर 2021) ट्विट केले. आपण दुबईला गेलोच नव्हतो, असा दावा समीर वानखडेंनी केला होता. हा दावा खोटा असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी समीर वानखडे दुबईतील हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विट केले आहेत. नवाब मलिक विरुद्ध समीर वानखडे या वादाची मालिका अजूनही सुरूच असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
१०० कोटी डोस हा केवळ एक आकडा नाही, हे देशाच्या सामर्थ्यांचं प्रतिबिंब : पंतप्रधान नरेंद्र मोदी
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एका व्हॉट्सअप मेसेजच्या आधारे समीर वानखडेनं बोगस कारवाई केल्याचा आरोप नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. एका दौऱ्याच्या वेळी वानखडे दुबईला गेल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. हा आरोप फेटाळून लावत आपण दुबईला गेलोच नसल्याचं वानखडेंनी म्हटलं होतं. त्यानंतर नवाब मलिक यांनी काही फोटो ट्विट केले. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपानंतर NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी काल (21 ऑक्टोबर 2021) सायंकाळी पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून माझ्या मृत आईवर, रिटायर्ड वडिलांवर आणि बहिणीवर नजर ठेवली जात आहे. माझ्या कुटुंबावर घाण शब्द आणि वैयक्तिक आरोप केले जात असून त्याचे मी खंडण करतो. यापुढे ते म्हणाले की, मी माझं काम करतोय, देशाची सेवा आणि ड्रग्सवर कारवाई करतोय यासाठी मला तुरुंगात टाकणार असाल तर मी तयार आहे.
Read Also :
- मुंबई पोलिसांनी २७ कोटींचे हेरॉईन पकडले, पण त्यात हेरॉईनच नव्हती म्हणून प्रसिद्धी मिळाली नाही
- मुंबईतील इमारतीच्या आगीत एकाचा मृत्यू; महापौर किशोरी पेंडणेकर म्हणतात, सिक्युरिटीवर कारवाई करू…
- माजी आमदार विलास लांडेंचा समंजसपणा; आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित गव्हाणेंचे गुडघ्याला बाशिंग
- कोरोना लसीचे १०० कोटी डोस खरोखरच दिले गेलेत का? संजय राऊतांचा सवाल
- एक म्हणतो 25 हजार कोटींचा घोटाळा, दुसरा म्हणतो 10 हजार कोटींचा घोटाळा; अजित पवार भडकले