मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला. परंतु राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना जे भाजपचे नेते नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते. ते काहीसे आता शांत झाल्याचं दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील, पण मंत्रिपद केव्हा मिळणार माहीत नाही?” बच्चू कडू
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेनेच्या नेत्यांवर तुटून पडले होते. यामध्ये अनिल परब, भावना गवळी, यामिनी जाधव, यशवंत जाधव तसेच प्रताप सरदेसाई यांचा समावेश आहे. यांच्यावर किरीट सोमय्या सातत्याने हल्ला चढवत होते. परंतु एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केल्याने आणि या नेत्यांनी शिंदेंना पाठिंबा दिल्याने किरीट सोमय्या आता शांत झाल्याचे दिसत आहेत.
“ताई अजून तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्या नाहीत”; मनसेचा ‘त्या’ ट्विटवरून टोला
केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत या नेत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी देखील किरीट सोमय्या सातत्याने करीत आले आहेत. परंतु शिंदेंना पाठिंबा दिलेल्या नेत्यांबाबत किरीट सोमय्या सध्या काही बोलताना दिसत नाही. यावरून किरीट सोमय्या यांच्यावर तोंड लपवत फिरण्याची देवेंद्र फडणवीस यांनी वेळ आणली आहे. असा टोला रूपाली पाटील यांनी भाजपला लगावला आहे.
“एक गिरणी कामगाराचा मुलगा मंत्रीपदापर्यंत पोहचला, ही लोकशाहीची खासियत”; चंद्रकांत पाटील
दरम्यान, तसेच शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये असलेले मंत्री संजय राठोड यांच्यावर देखील भाजप नेत्या चित्रा वाघ या सातत्याने हल्ला चढवत होत्या. भावना गवळींना देखील किरीट सोमय्या तुरूंगात डांबण्याची भाषा करीत होते. तसेच या सर्व नेत्यांवर इडी चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी देखील सोमय्या करीत होते. परंतु आता ते चित्र बदललं आहे. त्यामुळे सोमय्यांवर विरोधक टिका करीत आहे.
Read also
- “बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंंत्री अन् मला काका-काका बोलून माझ्या जागेवर जाऊन बसला”; रामदास कदम
- सेवा पंधरवडा निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दाखले वाटप
- “शिंदेंनी मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतल्याचं फडणवीसांना पचलं नाही, म्हणून ते…;”रूपाली पाटलांचा खोचक टोला
- अजब सरकार..! “मंत्री करायला जर दोन महिन्यांचा काळ गेला असेल तर..;”धनंजय मुडेंची टिका
- “शिंदे-फडणवीस सरकार बेशिस्तपणे वागतात, अन् ते फक्त अजित दादांना घाबरतात”; धनंजय मुंडे