मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या जंयती. त्यानिमित्ताने राज्यातील विविध नेत्यांनी जंयतीनिमित्ताने अभिवादन केलं. परंतु राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने केलेलं ट्विट डिलीट केलं. त्यानंतर त्यांच्यावर मनसेने निशाणा साधला आहे.
उत्तराखंडमधील अजस्त्र काला नाग पर्वतावर चढाई ; ‘लेक वाचवा’चा दिला संदेश
तसेच राज ठाकरे यांनी देखील प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंची आज जंयती. माझ्या आजोबांचा धर्म या कल्पनेला विरोध नव्हता. उलट ते कमालीचे हिंदू धर्माभिमानी होते. फक्त धर्माच्या नावावर चालणारी भोंदूगिरी, फसवेगिरी त्यांना रूचायची नाही. असली भोंदूगिरी करणाऱ्यांवर ते हल्ला चढवत. आख्खं आयुष्यय त्यांनी लोकांच्या मनातील धर्माची भिती काढून धर्माबद्दल आस्था, प्रेम निर्माण, व्हावं, यासाठी वेचलं असंही त्यांनी म्हटलं आहे.
“मराठवाडा मुक्तिसंग्रामचा कार्यक्रम शिंदेंनी 15 मिनिटांत उरकला, अन् शिंदे-सेनेत वाद पेटला”
प्रबोधनकार ठाकरेंनी नाठाळांवर वेळेस रट्टे ओढताना मागे पाहू नका, असं आवाहन केलं आहे. हे करताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत हे विसरू नका, याची आठवणही त्यांनी आपल्या भाषणात करून दिली आहे. रझाकारी औलादी डोकं वर काढत आहेत. अनेक ठिकाणी आया-बहिणींची छेड काढत आहेत. भाषणात आमच्या आजोबांनी म्हटलं त्याप्रमाणे अशा लोकांच्या गालावर वळ उठवा. हे करताना मी या पक्षाचा असला विचार करायची गरज नाही, कदाचित तुमचे नेते कच खातील पण तुम्ही खाऊ नका, प्रबोधकारांना अभिवादन करताना एक निर्धार प्रत्येकांन केला पाहिजे. जिथेे कुठे, अन्याय दिसेल. तिथे पेटून उठायचं आणि अन्यायाचा फडशा पाडायचा. हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“रझाकार अन् सजाकारांचा बंदोबस्त मनसे करणार”; राज ठाकरेंचं औरंगाबादच्या ‘मुक्ति’संग्रामाचं पत्र
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सकाळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, सत्याशोधक विचारांचा वसा घेऊन त्यासाठी आयुष्यभर लढा देणारे प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांना विनम्र अभिवादन. त्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. परंतु मनसे नेते संदीप देशपांडे त्यांनी या ट्विटचं स्क्रिनशॉट काढून त्यावर ते म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरेंना के. सी. ठाकरे म्हणण्याएवढ्या तुम्ही मोठ्या झाला नाहीत ताई, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसेच एस. जी. पवार साहेबांच्या सांगण्यावरून ट्वीट डिलीट केलंत का ताई? असा खोचक सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
Read also
- “एक गिरणी कामगाराचा मुलगा मंत्रीपदापर्यंत पोहचला, ही लोकशाहीची खासियत”; चंद्रकांत पाटील
- खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे..! फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पांची यादीच राष्ट्रवादीने केली जाहीर
- मग मोदीजींसाठी महाराष्ट्र म्हणजे पाकिस्तान आहे का ? राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल
- “अजूनही वेळ गेलेली नाही”; मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमांबाबत मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांचा संताप
- “सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या फडणवीसांना तरूणांच्या व्यथा काय समजणार”?; रूपाली पाटलांचा सवाल