मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार, सत्तेत आल्यापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. तसेच, सरकारसोबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील विविध कारणांनं चर्चेत असतात. यावेळी देखील ते एका वेगळ्याच कारणाने चर्चेत असून, पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिलं नाव पटकावलं आहे.
शरद पवारांनी स्पष्ट करावं की, ते नक्की कोणत्या पदाचे उमेदवार आहेत – सुधीर मुनगंटीवार
‘प्रेश्नम’नं भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची त्रैमासिक मान्यता रेटिंग सुरू केली आहे. यासाठी पहिल्या फेरीत त्यांनी १३ राज्यांची निवड केली होती. या राज्यांत भारतातील ६७% लोकसंख्या आहे. यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे.
बहुमत आहे तर घाबरता का? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, पाहूया ताकद – फडणवीसांच चॅलेंज
या सर्वेक्षणानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक रेटिंग मिळालं असून, सर्वेक्षणात जवळपास ४९% मतदारांनी, उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे. उद्धव ठाकरेंनंतर या यादीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान असून, त्यांच्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा क्रमांक आहे.
आरक्षणाचे नेतृत्व तुम्ही करा, मी सपोर्ट करतो; फडणवीसांची भुजबळांना राजकीय साद
वर उल्लेखलेल्या १३ राज्यांतील जवळपास १७,५०० मतदारांचं सर्वेक्षण करुन ‘प्रेश्नम’नं हा निष्कर्ष काढला आहे. तसेच, यात प. बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांची नुकत्याच निवडणुका झाल्यामुळे निवड करण्यात आली नसून, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा पुढील टप्प्यात समावेश करण्यात येईल.
Read Also :
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी खलबतं; महाविकास आघाडी थेट नियमच बदलणार!
- कौरव कोण?, पांडव कोण? याचं मूल्यमापन फडणवीस, पाटीलच करतील – विनायक मेटे
- छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; कोण करणार ओबीसींचे नेतृत्व?
- संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील केल्यास, मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार’; उमा खापरेंचा इशारा
- नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेवर, अशोक चव्हाण म्हणतात….