लातुर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर मोदी कचऱ्याच्या डब्यात असते. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. औसा याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून ठाकरेला भाजप कसं प्रत्युत्तर देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…पुण्यात लोकसभेसाठी भाजपात स्पर्धा वाढली, मोहोळांविरोधात ‘तो’ बॅनर नेमका कोणी लावला ?
ज्यावेळी मोदी नाव कुणालाही माहिती नव्हतं. त्यावेळाही आम्ही धाराशिव जिंकत होतो. शिवसेनाप्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत. आम्हाला आमचे कट्टर शिवसैनिक आणि जीवाला जीव देणारे कट्टर मावळे पुरेरे आहेत. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या पेटीत टाकायला निघाले होते. तेव्हा हिंदु ह्यदयसम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं. तर मोदी दिसलेच नसते. असं म्हणत ठाकरेंना जोरदार घणाघात चढवला.
हेही वाचा…“अजित पवार गटाचा उडाला गोंधळ,” शरद पवारांनी डिचवल्याने अजित पवार गटाला ‘ते’ ट्विट करावा लागलं डिलीट
दरम्यान, यासभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा शेपुट घाल्या गृहमंत्री म्हणून उल्लेख केला. ठाकरे म्हणाले की, अमित शाह यांनी महाराष्ट्रात येऊन आमच्यावर टिका केली. अमित शाह शेपुट घालून महाराष्ट्रात येत आहेत. परंतु तिकडे मणिपुर पेटलं असता त्यांची त्याठिकाणी जायची हिमंत नाही. असा हा शेपुट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला आणि आमच्यावर फणा काढून गेला. माझ्यावर काय बोलले त्यांचा मी नंतरच्या सभेत समाचार घेईनच. परंतु त्यांची या राज्यांमध्ये जायची हिमंत होत नाही, असा हल्लाबोल ठाकरेंनी चढवला.
READ ALSO :
“शेपुट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला अन् आमच्यावर फणा काढून गेला”, ठाकरेंचा भाजपवर जोरदार घणाघात
हेही वाचा..“मुंबई पालिका भ्रष्टाचाराचे आगार, 700 कोटींच्या कंत्राटावर डल्ला”, विरोधकांचा हल्लाबोल
हेही वाचा…“नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात सांगेन की शरद पवारांनी माझ्यावर..,” सुनील शेळकेंचं पवारांना प्रत्युत्तर
हेही वाचा…“..लक्षात ठेवा मलाही शरद पवार म्हणतात,” शरद पवारांनी शेळकेंना दिला इशारा
हेही वाचा…“तर फडणवीसांना गुजरातमध्ये जाऊन स्वत : चा प्रचार करावा,” शरद पवार गटाने फडणवीसांना डिवचलं