पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण आपपल्या मतदारसंघात उमेदवारीसाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. भाजपकडून लोकसभेसाठी राज्यात अद्यापही उमेदवारांची घोषणा जाहीर केली नाही. परंतु पुणे लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर मुरलिधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. असे असताना मोहोळ यांच्या विरोधातील बॅनर्स महापालिका परिसरात लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात याची उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
हेही वाचा…दिल्लीत खलबतं, महाराष्ट्राचे नेते दिल्लीत दाखल, जागावाटपाचा तिढा सुटणार
मोहोळ यांच्या विरोधात काही मजकूर लिहून हे बॅनर्स पालिका परिसरात लावण्यात आले होते, हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यानंतर लागलीच ते हटवण्यात आले. परंतु लावणाऱ्याने देखील त्याची व्यवस्थित चर्चा होईल याची दक्षता घेतल्याचं दिसत आहे. राजकीय नेत्यांवर टीका करणारे असे “पुणेरी” बॅनर्स लावण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांबद्दल असे पोस्टर लावण्यात आलेले होते. परंतु लोकसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपच्या प्रबळ दावेदारा विरोधातील हे बॅनर्स असल्याने चर्चा झाली नाही तर नवलच.
हेही वाचा…निवडणुक न लढवण्याचे संभाजीराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले “मी लोकसभेसाठी १०० टक्के योगदान दिलं असतं..पण…”
मोहोळांच्या उमेदवारीची विरोधकांना चिंता की स्वकीयांना धास्ती
भाजपमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात करणारे मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या कामाच्या जोरावर युवा मोर्चापासून पक्षात काम केले आहे. भाजपची पहिल्यांदाच महापालिकेत सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात आले तर लागलीच महापौर पदी काम करण्याची संधी देखील पक्षाकडून मोहोळ यांना मिळाली. आपल्या महापौरपदाच्या काळात कोरोनाच्या महामारीत त्यांनी केलेल्या कामामुळे संपूर्ण शहरात एक वेगळी ओळख निर्माण झाली. तर आज मोहोळ हे प्रदेश भाजपचे सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. मोहोळ यांच्या सारखा उमेदवार लोकसभेसाठी दिल्यास हमखास विजयी होण्याची शक्यता असल्याने भाजप पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाला पसंती दिली जात असल्याची चर्चा आहे.
मोहोळ यांचे लोकसभा उमेदवार म्हणून नाव निश्चित मानले जात असतानाच आज लागलेले बॅनर हे विरोधी पक्षातील नेत्यांनी लावलेले डोके आहे, की मोहोळ यांची वाढती लोकप्रियता, पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीवर असणारी पसंती, यामुळे भाजपमधीलच एखाद्या इच्छुकाने केलेला हा “कार्यक्रम” आहे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवार गटाचा उडाला गोंधळ,” शरद पवारांनी डिचवल्याने अजित पवार गटाला ‘ते’ ट्विट करावा लागलं डिलीट
हेही वाचा…“जंयत पाटलांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ येऊ देऊ नका,” अजित दादांच्या आमदाराने रोहित पवारांना फटकारलं
हेही वाचा…कमळावर की धनुष्यबाणावर निवडणुक लढणार ? श्रीरंग बारणेंनी स्पष्ट सांगितले
हेही वाचा…“अजितदादांचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणुक लढतील,” बच्चू कडू यांचा मोठा दावा
आढळराव राष्ट्रवादीत तर बारणे भाजपमधून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या सेनेत आणखी पेच वाढला